झैनबिया स्कूल सीबीएसई दहावी बोर्डच्या विद्यार्थ्यांचे यश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Channel Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 16 मे 2025। बारामती । कटफळ येथील झैनबिया इंग्लिश मीडियम स्कूलचा या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावीचा सीबीएसई बोर्डचा 100% निकाल लागला आहे.

या परीक्षेत अनुष्का कालगावकर हिने 98% मिळवून प्रथम क्रमांक मिळला आहे. आदित्य खत्री याने 97.4% मिळून द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तसेच इकरा शेख 97.2% मिळून तृतीय क्रमांक मिळविला आहे. अमूल्या वासवडे 97% व आर्या रेडकर 97% हिने चतुर्थ क्रमांक मिळविला आहे. सारा शेख 96.4% व तनिष्का गावडे 96% हिने पाचवा क्रमांक मिळविला आहे. नम्रता नेवसे 95.2% वआरोही गावडे यांनी 95%सहावा क्रमांक मिळवला आहे. टक्केवारी मिळवलेले विद्यार्थी खालील प्रमाणे आहेत. 90% ते 100% मिळालेले 17 विद्यार्थी आहेत. 80% ते 90% मिळालेले 13 विद्यार्थी आहेत.

या यशाबद्दल अब्बास मोहम्मद हुसेन एज्युकेशन ट्रस्ट बारामती व स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका इन्सिया नाशिकवाला यांनी शिक्षकवर्ग, शिक्षक इतर कर्मचारी, यशस्वी विद्यार्थ्यांचे व पालकांचे व शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!