
दैनिक स्थैर्य । दि.०३ जानेवारी २०२२ । फलटण । विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव व फलटणचे युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी आगामी फलटणच्या राजकारणात व समाजकारणात सक्रिय व्हावे, अशी मागणी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक किरण निंबाळकर यांनी अनोख्या पत्राद्वारे केलेली आहे.
याबाबत मुंबई येथे युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांना वेगळ्या पद्धतीचा लखोट्याचे विनंती पत्र देवुन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक किरण निंबाळकर यांनी मागणी केलेली आहे.
आगामी काळामध्ये होत असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुका असो किंवा ईतर कोणत्याही निवडणुका असो श्रीमंत अनिकेतराजे नाईक यांच्या उच्च शिक्षणक्षणाच्याद्वारे फलटण तालुक्यातील युवकांना व सर्वसामान्य नागरिकांना मार्गदर्शन मिळावे, असेही किरण निंबाळकर यांनी पत्रामध्ये व्यक्त केलेले आहे.
विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पॉलिटिक्स ऑफ डेव्हलमेंट म्हणजेच विकासाचे राजकारण अनुभवायला मिळाले आहे. त्यासोबतच श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे सुध्दा मोलाचे मार्गदर्शन फलटण तालुक्यातील सर्वांनाच वेळोवेळी मिळाले आहे. यांच्यासोबतच युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक यांनी राजकारणात सक्रिय झाल्यास फलटण तालुक्यातील युवक हे कायमच आपल्यासोबत असतील, असेही किरण निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
फलटण नगरपरिषदेमध्ये गेली तीस वर्षे ही विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आहे व ह्या पुढे सुध्दा अबाधितच राहणार आहे. तालुक्यातील जनतेने राजे कुटुंबीयांवर जीवापाड प्रेम केलेले आहे. त्यामुळे आता फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी सक्रीय व्हावे, असेही किरण निंबाळकर यांनी पत्रामध्ये स्पष्ट केले आहे.