युवकांनी गावच्या विकासासाठी योगदान द्यावे सौ. वेदांतिकाराजे; कोंडवे येथे विविध कार्यक्रम उत्साहात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ सप्टेंबर २०२१ । सातारा । आपले गाव स्वच्छ, सुंदर, निसर्गसंपंन्न आणि विकसित असले पाहिजे. ग्रामस्थांना अपेक्षित विकासकामे मार्गी लावून ग्रामपंचायतीने गावाला आदर्श गाव बनवनले पाहिजे आणि त्यासाठी युवकांनी योगदान दिले पाहिजे, असे मत कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी व्यक्त केले.

कोंडवेचे युवा नेते महेश गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त महेश गाडे मित्रसमूहाच्यावतीने रक्तदान शिबीर आणि गरजू लोकांना अन्नधान्य किट वाटप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सौ. वेदांतिकाराजे भोसले बोल्ट होत्या. यावेळी पंचायत समितीच्या सभापती सभापती सौ.सरिता इंदलकर, अजिंक्यतारा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, ज्येष्ठ नेते शिवराम घोरपडे, मधुकर निंबाळकर, महेश गाडे, सरपंच किरण गाडे, उपसरपंच श्रीमती सुलभा भुजबळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.

महेश गाडे मित्रसमूहाचा उपक्रम स्तुत्य असून गाडे यांच्या माध्यमातून कोंडवे येथे युवकांचे मोठे संघटन आहे. या संघटनाच्या माध्यमातून गावातील सर्व प्रकारच्या समस्या मार्गी लावण्याचे काम महेश गाडे यांच्यामार्फत सुरु आहे. गावाच्या विकासासाठी लागेल ती मदत करू, असा शब्द सौ. वेदांतिकाराजे यांनी यावेळी दिला. यावेळी रक्तदान केलेल्या व्यक्तींचा सौ. वेदांतिकाराजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास सौ.सीमा जाधव, मोहित चोरगे, बजरंग दीक्षित, नवनाथ जाधव, संभाजी इंदलकर, राहुल काळे, अमोल मेणकर, पत्रकार बाळू मोरे, अरुण पवार, दीपक भुजबळ, मनोज साळुंखे, विक्रम वाघमळे, प्रवीण पवार, विकास साळुंखे, मनोज घाडगे, रणजित सपकाळ, विकास बनकर, जमीर शेख, नीलेश भुजबळ, जावेद पठाण आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!