प्रभाग १३ मध्ये तिरंगी लढतीला तरुणाईचा प्रतिसाद ! राष्ट्रवादीचे राहुल निंबाळकर विकासाचा ‘पाढा’ वाचत आघाडीवर !


स्थैर्य, फलटण, दि. २२ नोव्हेंबर : फलटण नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३ (क) मध्ये यंदा रंगतदार तिरंगी लढत होत असून, या लढतीकडे संपूर्ण फलटणकरांचे लक्ष लागले आहे. या चुरशीच्या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (घड्याळ) उमेदवार राहुल निंबाळकर हे आपल्या प्रचारात प्रभावी ठरत आहेत. त्यांनी मतदारांसमोर यापूर्वी केलेली विकासकामे आणि भविष्यात करणार असलेली कामे यांचा सविस्तर ‘पाढा’ वाचायला सुरुवात केली आहे.

राहुल निंबाळकर यांची जनसंपर्क मोहीम सध्या जोरदार सुरू असून, त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विशेषतः युवा मतदारांचा प्रतिसाद राहुल निंबाळकर यांना अधिक मिळत आहे. तरुणाईचा उत्साह आणि राहुल निंबाळकर यांची कामाची धमक यांचा समन्वय या ठिकाणी दिसत आहे, ज्यामुळे प्रभागात त्यांच्या बाजूने सकारात्मक वातावरण तयार होत आहे.

राहुल निंबाळकर मतदारांना भावनिक साद घालत आहेत. ते सांगतात, “प्रभागाचा सुरू असलेला विकास अखंड सुरू ठेवण्यासाठी आपल्याला संधी द्यावी.” फलटण शहराला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या प्रवाहात कायम ठेवायचे आहे, असा स्पष्ट संदेश ते मतदारांना देत आहेत.

एकंदरीत, प्रभाग क्रमांक १३ (क) मधील तिरंगी लढतीत राहुल निंबाळकर यांनी ‘विकास सातत्याचा’ मुद्दा प्रभावीपणे मांडला आहे. पूर्वीच्या कामांची पुण्याई आणि युवा मतदारांचा पाठिंबा या दोन जमेच्या बाजू त्यांच्यासाठी महत्त्वाच्या ठरत आहेत. हा सुरु असलेला विकास अखंड सुरु ठेवण्यासाठी प्रभाग १३ (क) चे मतदार राहुल निंबाळकर यांच्यावर किती विश्वास दाखवतात, हे लवकरच स्पष्ट होईल.


Back to top button
Don`t copy text!