युवा महोत्सवातील ‘वैयक्तिक स्पर्धा जनरल चॅम्पियनशिप’ फलटणच्या मुधोजी महाविद्यालयाकडे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १६ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या विद्यार्थी विकास विभाग आणि रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी कॉलेज दहिवडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४३ वा मध्यवर्ती युवा महोत्सव दि. ११ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दहिवडी कॉलेज येथे पार पडला. यामध्ये मुधोजी महाविद्यालय फलटणच्या विद्यार्थी कलावंतांनी प्रथम कुलगुरू स्वर्गीय डॉ. आप्पासाहेब पवार वैयक्तिक स्पर्धा जनरल चॅम्पियनशिप फिरता चषक मिळवत उज्ज्वल यश संपादन केले.

या स्पर्धेत शास्त्रीय गायन – प्रथम क्रमांक, नाट्यगीत – प्रथम क्रमांक, शास्त्रीय सुरुवाद्य – प्रथम क्रमांक, शास्त्रीय तालवाद्य – प्रथम क्रमांक, भित्तिचित्र – प्रथम क्रमांक, व्यंगचित्र – द्वितीय क्रमांक, मातीकाम द्वितीय क्रमांक इ. वैयक्तिक कला प्रकारांचा तर लोकसंगीत वाद्यवृंद – द्वितीय क्रमांक आणि सांघिक रचनाकृती – तृतीय क्रमांक या सांघिक कला प्रकारांचा समावेश आहे.

या यशाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तसेच विधान परिषदेचे माजी सभापती, विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य डॉ. पार्श्वनाथ राजवैद्य, संस्थेचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम सर त्याचबरोबर मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम, उपप्राचार्य डॉ. एस. जी. दीक्षित, आय. क्यू. ए. सी. कॉर्डिनेटर प्रो. डॉ. टी. पी. शिंदे सर, महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य तसेच प्राध्यापक वर्ग त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यशस्वी विद्यार्थ्यांना कलाविष्कार विभागप्रमुख प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर सर व कमिटीतील इतर सदस्यांचे तसेच विभागातील माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन लाभले.


Back to top button
Don`t copy text!