युवा नेते श्रीमंत विश्वजितराजेंचा वाढदिवस उत्साहात साजरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 26 डिसेंबर 2023 | फलटण | फलटण पंचायत समितीचे माजी सभापती तथा युवा नेते श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि. 23 डिसेंबर 2023 रोजी भव्य रक्तदान शिबिर रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन नवलभाई मंगल कार्यालय येथे स. १० वाजता करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईट निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी फलटण नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका सौ. सुवर्णा खानविलकर, सौ. वैशाली चोरमले, सौ. दिपाली निंबाळकर, सौ. प्रगती कापसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर,
सातारा जिल्हा परिषदेची माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, फलटण पुरवठा संघाचे चेअरमन धनंजय पवार, निंभोरे ग्रामपंचायत उपसरपंच मुकुंद रणवरे, श्रीराम सहकारी साखर कारखाना महादेव माने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक मोहनराव निंबाळकर, श्रीमंत रामराजे युवा मंच अध्यक्ष राहुल निंबाळकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती विवेक शिंदे, अमरसिंह देशमुख, निंभोरे ग्रामपंचायत सदस्य नितीन मदने, फलटण तालुका इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष सिकंदर डांगे, विशाल तेली, जिंती ग्रामपंचायत उपसरपंच शरद रणवरे, सागर दोशी, शिवव्याख्याते व्याख्याते प्रविण रणवरे, चंद्रकांत रणवरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ इत्यादी मान्यंवर याप्रसंगी उपस्थित होते.

फलटणचे आराध्य दैवत श्री. प्रभू श्रीरामचंद्र यांचे मंदिरात सर्वप्रथम सकाळी श्रीमंत विश्वजीतराजे यांनी जाऊन पूजा केली व दर्शन घेतले त्यानंतर फलटण येथील निवासस्थानी श्रीमंत विश्वजीतराजे यांच्या मातोश्री सौ. प्रियालक्ष्मीराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांचे औक्षण केले. श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्ता शिबिरामध्ये जवळपास २३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. तर यावेळी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरामध्ये कान, नाक, घसा तपासणी शिबिर त्याचबरोबर रक्तदाब तपासणी व त्यावर मोफत सल्ला व महिलांशी निगडीत आजारांवर मोफत उपचार व सर्व रोगांवर मोफत मार्गदर्शन करण्यात आले या मोफत आरोग्य शिबिराचा शेकडो बंधू भगिनींनी लाभ घेतला.

श्रीमंत विश्वजीतराजे यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत प्रचंड मोठ्या संख्येने युवकांनी तसेच फलटण तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

यावेळी विडणी येथील श्रीमंत विश्वजीतराजे यांचे कार्यकर्ते प्रवीण नाळे व त्यांच्या अनेक समर्थकांनी श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जेसीबी मधून फुलांचा वर्षाव केला.

श्रीमंत विश्वजीतराजे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन महेश ढवळे, विजय भिसे, प्रितसिंह खानविलकर, सागर निकम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अक्षय गायकवाड, पै. अभिजीत जानकर, अमर पिसाळ, प्रविण बोराटे, प्रवीण नाळे, श्रीधर कदम, सौरभ नष्टे, गोल्डन रुपनवर, पिनू निंबाळकर, किशोर निंबाळकर, वरून अब्दागिरे, जय रुपनवर, जिवन पिसाळ, रुपेश नेरकर, यश शिंदे, इत्यादींनी केले होते.


Back to top button
Don`t copy text!