युवा नेते सह्याद्री भैय्या कदम यांच्या वाढदिवस निमित्त उद्या ढवळपाटी येथे कुस्त्यांचे भव्य मैदान; रविवारी स्वीकारणार शुभेच्छा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २ जून २०२३ | फलटण | युवा नेते सह्याद्री भैय्या कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शनिवार दि. ३ जून रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत फलटण – पुसेगाव रोडवर ढवळपाटी, ता. फलटण येथे भव्य कुस्त्यांचे मैदान भरविण्यात येणार असून फलटण तालुक्यातील पैलवानांना या मैदानात संधी देवून प्रौत्साहित करण्यात येणार आहे.

माजी आमदार स्व. सूर्याजीराव शंकरराव तथा चिमणराव कदम यांची प्रामुख्याने ग्रामीण जीवनाशी, शेती – शेतकऱ्यांशी असलेली जवळीक, त्यांच्या सुख दुःखात सहभागी होण्याची भावना जपत त्यांचे सुपुत्र युवा नेते सह्याद्री भैय्या कदम यांची वाटचाल सुरु असल्याने त्यांनी गतवर्षी आणि यावर्षीही आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून जंगी कुस्त्यांचे मैदान भरविण्याला प्राधान्य दिले आहे.

गतवर्षी राज्यस्तरीय कुस्ती मैदान भरवून, मोठ मोठी बक्षिसे देवून राज्यातील नामवंत पैलवानांना येथे निमंत्रित करुन त्यांच्या कुस्त्या पाहण्याची संधी फलटण करांना उपलब्ध करुन दिली, कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांनी येथे येऊन सह्याद्री भैय्या कदम यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले होते.

फलटण तालुका हा नेहमीच ग्रामीण खेळ किंवा कुस्ती, खो – खो, कबड्डी यासारखे मैदानी खेळ व अन्य पारंपरिक खेळामध्ये आघाडीवर असलेला तालुका असल्याने माजी आमदार स्व. चिमणराव कदम यांनी त्यांच्या ५० वर्षांहून अधिक कालावधीत तालुक्याच्या राजकारण व समाजकारणावर अधिराज्य करताना येथील परंपरागत खेळांना प्रोत्साहन दिले. त्यासाठी गावागावात खेळाचे, व्यायामाचे साहित्य, तालीम उभारुन दिल्या.

त्या पार्श्वभूमीवर युवानेते सह्याद्री भैय्या कदम आपल्या वाढदिवसानिमित्त प्रतिवर्षी कुस्त्यांचे भव्य आखाडे भरवून स्व. चिमणराव कदम यांचे विचार पुढे नेत तरुणांना एकप्रकारे प्रोत्साहन देत आहेत. तालुक्यातील कुस्ती शौकीन आणि पैलवानांनी त्यांच्या या उपक्रमात सहभागी होऊन साथ करावी असे आवाहन सह्याद्री भैय्या कदम मित्र मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

वाढदिवसानिमित्त शनिवार दि. ३ जून रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत प्रामुख्याने तालुक्यातील पैलवानांना प्राधान्य देवून या कुस्ती मैदानाचे आयोजन ढवळपाटी, ता. फलटण येथे करण्यात येत असून त्याबाबत अधिक माहितीसाठी पै. अजय कदम सर ८०३७३११३४१, पै. हिंदुराव लोखंडे सर ८७६६९८२२८९, पै. शंभू दडस सर ८३०८४५३१६४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान युवा नेते सह्याद्री भैय्या कदम हे वाढदिवसानिमित्त रविवार दि. ४ जून रोजी सकाळी ९.३० पासून आपल्या सूर्य निवास, कमला निंबकर शाळेनजिक, लक्ष्मीनगर, फलटण येथील निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!