दैनिक स्थैर्य । दि. २८ जुलै २०२२ । लोणंद । लोणंद – सातारा रस्त्यावर लोणंद शहरात अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार झाला. लोणंद गावातील कुमार क्लॉथ सेंटर समोर लोणंद – सातारा रस्त्यावर नागेश दिलीप मोरे वय 21 वर्षे रा भुरकरवाडी, तरडगाव, ता. फलटण जि सातारा हा पायी चालत जात असताना त्याला कोणत्यातरी अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात नागेश मोरे हा गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यु झाला. त्याच्या मृत्युस जबाबदार असणाऱ्या अज्ञात वाहन चालकाने वाहन न थांबंवता व जखमीस दवाखान्यात न नेता पोलीसाना माहीती न देता तेथून पळून गेला म्हणून अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात निलेश दिलीप मोरे यांनी लोणंद पोलीसात तक्रार दिली आहे. पुढील तपास लोणंद पोलीस करीत आहेत.