स्थैर्य, फलटण, दि. 19 : कोणत्याही प्रकारचे संकट हे संकट न समजता एक संधी समजून या पुढे वाटचाल करावी लागेल, तथापि कोविड 19 चे संकट सध्या जगासह आपल्या ही देशावर घोंगावत आहे,त्या साठी या संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने हे संकट दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत व कामाची मिळेल त्या कंपनीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत, त्या ठिकाणी जाऊन काम करीत मराठा समाजातील युवकांनी आर्थिक स्थैर्य प्राप्त करावे असे आवाहन युवा नेते तथा मराठा क्रांती मोर्चाचे मार्गदर्शक,समन्वयक अभिजित सुर्यवंशी (बेडके) यांनी तरुणांना केले आहे.
आत्तापर्यंत आपल्या देशात अनेक संकट आली,मात्र भारत देशाने या संकटांचा सामना करीत आपले कर्तव्य पार पाडले याचा इतिहास जगासमोर आहे,त्या मुळे कोरोना कोविड 19 चे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत,त्या मुळे अनेक लोक विचलित झाले आहेत, तथापि लाखो लोक आपल्या घराकडे विविध राज्यात जात आहेत, या मुळे पिढ्यानपिढ्या कामासाठी इतर राज्यातील लोक वास्तव्य करीत होते, ते लोक कोरोनाच्या धास्तीने आपापल्या भागात जात आहेत, त्यांच्या जाण्याने अनेक ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत त्या मराठी व मराठा समाजातील युवकांनी दवडू नयेत असे सुर्यवंशी(बेडके) यांनी सांगितले आहे.
कोरोना कोविड 19 चे संकट हे खूप मोठे आहे, त्या मध्ये जगातील अनेक देश या कोरोनाचा सामना करीत आहेत, तर हजारो लोकांचा या मूळे दुर्दैवाने मृत्यू झाला आहे, तर लाखो लोक कोरोनाशी झुंज देत आहेत, अशी भयावह परिस्थितीत जग कोरोनाशी दोन हात करीत आहे, तसेच अनेक देश या कोरोनाची लस शोधण्यासाठी प्रयत्न करीत आहेत, मात्र ती सध्या कुठंही ही लस उपलब्ध नसल्याने महाराष्ट्रात म्हणजे मुंबई, पुणे,नागपूर,पालघर सारख्या ठिकाणी लाखो परप्रांतीय काम करीत होते, त्या मुळे स्थानिक मुलांना नोकरी मिळत न्हवती, मात्र आता लाखो परप्रांतीय लोक आपल्या राज्यात जात आहेत, त्या ठिकाणी नोकरी मिळवण्यासाठी व मराठा समाजातील युवकांनी प्रयत्न करीत आलेली संधी दवडू नये असे आवाहन अभिजित सुर्यवंशी (बेडके) यांनी युवकांना केले आहे.
भारत देश हा युवकांचा देश म्हणून प्रसिद्ध आहे, तर मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते,तर या मुंबई मायनगरीत अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध होतील,तर आशिया खंडातील सर्वात मोठे औद्योगिक क्षेत्र असलेल्या पालघर,व महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे व उपराजधानी असलेल्या नागपूर या ठिकाणी लाखो नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत,या साठी मराठा समाजातील युवकांनी प्रयत्न करावेत व आपले व आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून घ्यावे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.