आंबेडकरी चळवळीतील युथ आयकॉन : सिद्धार्थ प्रबुद्ध

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०५ ऑगस्ट २०२२ । फलटण । फलटणच्या आंबेडकरी चळवळीला एक दैदिप्यमान इतिहास आहे.परंपरा आहे.याच परंपरेला पुढे घेऊन जाणारा तरुण म्हणजेच सिद्धार्थ प्रबुद्ध. २३ एप्रिल १९३९ रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी फलटण मध्ये “ प्रजा परिषद “ घेतली होती . तेव्हा पासून फलटण आंबेडकरी चळवळीचे केंद्र झाले आहे.महाराष्ट्रात कुठेही होणाऱ्या अन्याय-अत्याचाराविरोधात विविध मार्गाने आंदोलन करण्यासाठी पहिली मशाल फलटण मधून धगधगते.यासाठी आतापर्यंत शेकडो कार्यकर्त्यांनी योगदान दिले आहे. सन २००५ धम्मचक्र प्रवर्तन सुवर्ण महोत्सवी वर्षापासून सुरू झालेल्या कार्यक्रमात सिध्दार्थने विद्यार्थीदशेपासून (वय १७) स्वयंसेवक म्हणून कार्यास सुरूवात केली. याकाळातील सुवर्ण महोत्सव सांगता समारंभात “आम्ही बौद्ध का झाले?” या बाबासाहेबांच्या धम्मदिक्षेच्या ऐतिहीसिक भाषणाचे सिद्धार्थच्या आवाजात ओडीओ सिडी प्रकाशित झाली. तसेच धम्मयान चौकातील झालेल्या नाट्य कार्यक्रमात बाबासाहेबांची भूमिका केली. वर्षभर, ३६५ दिवसाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषण वाचन कार्यक्रमाची व्यवस्था, यात समाजातील अभ्यासू व्यक्तींची रोज ऐकलेले आंबेडकरी विचार, यामुळे आंबेडकरी साहित्य वाचण्याची व कार्य करण्याची आवड त्याच्यात निर्माण झाली. यावेळी शिक्षणातील राखीव जागा बंद करण्याचे शासनाचे धोरण ठरले होते या विरोधात राष्ट्रपतीना हजारो संह्यांचे निवेदन दिले होते.सुवर्ण महोत्सवी वर्षानंतर ‘दर रविवारी बुद्ध विहारात गेले पाहिजे’ हे अभियान सुरू झाले.या मध्ये बाबासाहेबांनी केलेल्या भाषणांचे वाचन व त्यांवर आधारीत चर्चांमध्ये सिद्धार्थने स्वयंसेवका बरोबरच अभ्यासपूर्ण विचार मांडायला सुरूवात केली. तसेच १४ वर्षे सुरू असलेल्या दर रविवारच्या कार्यक्रमाचे नियोजन, सुत्रसंचालन केले.

आंबेडकरी प्रजा परिषद व AIM :
पाच वर्षाच्या आंबेडकरी संस्कारातून सिद्धार्थ कार्यकर्ता म्हणून सिद्धार्थ प्रबुद्ध तयार झाला.
त्याने मित्रांना सोबत घेऊन बाबासाहेबांच्या फलटण भेटीच्या वर्धापन दिनी २३ एप्रिल २००९ रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर इग्नायटेड मिशन ची सुरूवात केली. तर २३ एप्रिल २०१० रोजी आंबेडकरी प्रजा परिषद घेतली या परिषदेला महाराष्ट्रील काना कोपऱ्यातून हजारो आंबेडकरी बांधव उपस्थित होते. परिषदेमध्ये सिद्धार्थच्या “ भिमस्फूर्ती” पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तेव्हापासून सलग १२ वर्ष ही परिषद सुरु आहे. यामध्ये आदर्श व्यक्ती, संस्था व भीमजयंती मंडळांना पुरस्कार देण्यात येतो.

रचनात्मक कार्याला सुरूवात :
अन्यायाच्या प्रतिकारासाठी आणि न्याय मागण्यासाठी मोर्चे, आंदोलने आवश्यक असतातच. याबरोबरच समाजात आंबेडकरी वैचारिक आणि रचनात्मक कार्य उभी राहिली पाहिजेत म्हणून सिद्धार्थने AIM च्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी दरमहिन्याला क्लास वन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाचे कार्यक्रम सुरू केले.सोबतच स्पर्धा परिक्षा अभ्यासकेंद्र सुरू केले; त्यासाठी लायब्ररी सुरू केली.याबरोबरच मोफत कंप्युटर सेंटर सुरू केले. तसेच आंरराष्ट्रीय बौद्ध परिषद फलटणमध्ये घेतली. इयता १० वी विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यास वर्ग यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्काराचे कार्यक्रम घेतले. आंबेडकरी वह्या प्रकल्प ना नफा ना तोटा या तत्वावर सुरू केला.
साप्ताहिक कालमान या आंबेडकरी चळवळीच्या वर्तमानपत्राचे उपसंपादक म्हणून सन २००९ ते २०१२ पर्यंत कार्य केले.फलटणची आंबेडकरी चळवळ आंतरराष्ट्रीय सत्तरावर पोहचण्यासाठी वेबसाईट सुरू केली.

फलटणची चळवळ परदेशापर्यंत :

सिद्धार्थने फलटणची आंबेडकरी चळवळ सातारा, पुणे, सोलापूर या जिल्ह्यात पोहचली होती. आता ती महाराष्ट्र व देशाबाहेर पोहचवण्यासाठी परदेशी शिक्षण स्काॅलरशिप मिळवून इंग्लंड येथे उच्चशिक्षणासोबत सामाजिक कार्यास सुरूवात केली.

लंडनमधील बाबासाहेबांचा बंगला महाराष्ट्र शासनाने घ्यावा यासाठी यशवी प्रयत्न :
तो मिळवण्यासाठी यशस्वी प्रयत्न सिद्धार्थ केले तो शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्या नंतर शिक्षणा बरोबरच आंबेडकरी बांधवांच्या भेटी त्याने घेऊन अनेक कार्यक्रमांचे नियोजन केले. सिद्धार्थचे कार्य, आवड, कार्याची पद्धत बघून लंडनमधील टी व्ही चॅनल वर त्याची दोन वेळा मुलाखत झाली. हा फलटणच्या चळवळीचा गौरव म्हणावा लागेल.भारतीय दुतावासातील शासनाच्या विविध कार्यक्रमामध्ये सक्रीय सहभाग घेतला.सर्वात महत्वाचे म्हणजे बाबासाहेब इंग्लंडमध्ये असताना ज्या घरात दोन वर्षे वास्तव्यास होते ते घर भारत सरकारच्या ताब्यात येण्यासाठी खरेदी करावे म्हणून राज्यशासनाशी पत्र व्यवहार केला.त्यावेळी महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री इंग्लंड दौऱ्यावर असतांना सिद्धार्थाने तेथील स्थानिक कार्यकर्त्यांसह मंत्र्यांची भेट घेतली. शासन घर खरेदी करणार असे मंत्र्यांनी जाहीर केले. त्याची बातमी व फोटो टीव्हीवर दाखवंण्यात आली यात मंत्र्यांसोबत सिध्दार्थचा प्रमुख फोटो देण्यात आला.घर खरेदीची गतीने हालचाल झाली व पंतप्रधानांनी त्याचे उदघाटन केले.
शिक्षण पूर्ण करून मायदेशी आल्यानंतर सिद्धार्थने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यसाठी परदेशी शिक्षणासाठी कार्यक्रम घेतले.मोठ्या प्रमाणात विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी तयारी करू लागले . पण ५० विद्यार्थ्यांनाच स्काॅलरशीप मिळत असल्याने अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे विद्यार्थी संख्या वाढवावी म्हणून प्रयत्न केला त्यास यश येऊन ७५ विद्यार्थ्यांना स्काॅलरशिप मिळू लागली.सिद्धार्थ आज तंत्रज्ञानाचा वापर करून परदेशी शिक्षण आणि शिष्यवृत्तीसाठी मार्गदर्शन करत असतो. तर राज्यातील अनेक पालक व विद्यार्थी प्रत्यक्ष भेटत असतात.
आज सिद्धार्थ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचा अध्यक्ष आहे. त्याने मंडळाची लायब्ररी सुरू केली आहे. ज्यामध्ये २ हजार पुस्तकांचा संग्रह आहे.अशा पद्धतीने गल्ली ते आंतरराष्ट्रीय पातळीवर फलटणची आंबेडकरी चळवळ पोहचवणारा सिद्धार्य अत्यंत नियोजनबद्ध रचनात्मक कार्य करणारा हा कार्यकर्ता आज आंबेडकरी तरुणांचा युथ आयकॉन बनला आहे.
सिद्धार्थ प्रबुद्ध चा लहान भाऊ मिलिंद हा ही त्याच्या कार्याने प्रभावीत झाला आहे. त्याच्या प्रयत्नामुळेच तो सुद्धा परदेशात शिक्षण घेऊन सामाजिक कार्यात सहभागी होत आहे.
आज ५ ॲागस्ट सिद्धार्थचा वाढदिवस त्या निमित्त त्यास वाढदिवसाच्या मनापासून सदिच्छा।

 

मिलिंद दत्ता अहिवळे (Msc-Financ-UK)


Back to top button
Don`t copy text!