
स्थैर्य, सातारा, दि. १९: आष्टे (ता. सातारा) येथून युवक बेपत्ता झाल्याची फिर्याद बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. सूर्यकांत विजय पवार (वय 29, रा. पोगरवाडी, ता. सातारा) असे बेपत्ता युवकाचे नाव आहे. सूर्यकांत पवार हा आष्टे येथील मामा अनिल मोहिते यांच्याकडे रहायला होता. शनिवारी रात्री जेवण करून तो झोपण्यासाठी शेजारी असणार्या चुलत मामाच्या घरी गेला होता. रविवारी सकाळी तो घरी न आल्याने शोध घेतला असता त्याची दुचाकीही कोठे दिसली नाही. घरच्यांनी त्याचा सगळीकडे शोध घेऊनही तो ना सापडल्याने मामा अनिल तुकाराम मोहिते यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात सूर्यकांत पवार बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदवली असून पुढील तपास हवालदार राकेश देवकर करत आहेत.