वैरणीची कुटी मशिनमध्ये अडकून युवकाचा मृत्यू


दैनिक स्थैर्य । 25 जुलै 2025 । सातारा । कुटी मशिनमध्ये अडकून जाधववाडी (ता. माण) येथील हर्षद संजय जाधव (वय 23) या युवकाचा आज मृत्यू झाला.सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जाधववाडी येथील हर्षद जाधव हा युवक ट्रॅक्टरने केल्या जाणार्‍या मुरघास कुटी मशिनच्या वर उभा राहून वैरणीची कुट्टी तयार करत होता.त्याचदरम्यान त्या कुटी मशिनमध्ये वैरणीबरोबर दगड गेला. ज्या पत्र्याचा आधार घेऊन हर्षद उभा होता. तो पत्राच त्या दगडांमुळे उडून गेल्यामुळे त्याचा तोल जाऊन मशिनच्या ब्लेडवर पडला. त्यात त्याच्या पोट व पाठीला गंभीर दुखापत झाली होती. त्याला उपचारासाठी फलटण व नंतर बारामतीला नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान आज पहाटे त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे जाधववाडी व बिजवडी परिसरात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगी, बहीण, चुलते असा परिवार आहे.


Back to top button
Don`t copy text!