
दैनिक स्थैर्य | दि. १४ फेब्रुवारी २०२५ | वाई |
ओझर्डे (ता. वाई) येथे शेतात पॉवर ट्रेलरने काम करीत असताना रोटरमध्ये अडकून एका युवकाचा मृत्यू झाला आहे. राकेश अरविंद फरांदे (वय २९, रा. ओझर्डे) असे मृत युवकाचे नाव आहे.
मालदरा नावाच्या शिवारातील शेतात राकेश हा पॉवर ट्रेलरच्या रोटरने काम करत होता. यावेळी रोटरमध्ये अडकून तो गंभीर जखमी झाला. त्याला वाई येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याची खबर अविनाश फरांदे यांनी भुईंज पोलिस ठाण्यात दिली.