
दैनिक स्थैर्य । 11 मार्च 2025 । सातारा । मरजेवाडी, खंडाळा येथील युवकाचा मिरजेवाडी येथील बुडून मृत्यू झाला. मोहन बाबूराव साळुंखे (वय 23, मूळ, मिरजे, सध्या रा. कात्रज, पुणे) असे मृताचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, की मोहन बाबूराव साळुंखे हे पुणे येथे खासगी कंपनीत नोकरी आहेत. शेतीतील कामासाठी ते सध्या मिरजेवाडी येथे आले होते. त्यांच्या शेतानजीक असलेल्या पाझर तलावामध्ये आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मोहन व राज हे दोघे बंधू पोहण्यासाठी गेले. बराच वेळ पोहत असताना मोहनला दम लागल्याने तो पाण्यात बुडाला. त्यानंतर नातेवाइकांनी बराच वेळ शोध घेतला.
त्यानंतर स्थानिक मच्छीमार व रेस्क्यू टीमच्या सहकायनि मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. या घटनेची नोंद शिरवळ पोलिस ठाण्यात झाली असून, पुढील तपास सहायक फौजदार सपकाळ करीत आहे.