
स्थैर्य, नागठाणे, दि. 02 : अपशिंगे (मि.) ता.सातारा येथील १८ वर्षीय युवक/कोरोनाबाधित झाला असल्याचे निष्पन्न झाले.बुधवारी रात्री या युवकाचा अहवाल पोजेटीव्ह आला.बाधित युवक हा बोरगाव येथील खाजगी डेअरीत यापूर्वी सापडलेल्या बोरगावच्या बाधित युवकाच्या हायरिस्क कॉन्टॅक्ट मधील आहे.बाधिताच्या घराजवळील क्षेत्र मायक्रो कन्टेंटमेंट झोन करण्यात आले आहे.
शनिवारी रात्री उशिरा बोरगाव गावात आजोळी राहणारा युवक कोरोनाबाधित झाला होता.यावेळी प्रशासनाने त्याच्या हायरिस्क संपर्कात आलेल्या डेअरीतील काहीजणांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले होते.त्यापैकी अपशिंगे (मि.) येथील या युवकाचा अहवाल बुधवारी रात्री पोजेटिव्ह आला.आरोग्य विभागाने तात्काळ या युवकाच्या हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये आलेल्या घरातील ४ व बोरगाव येथील डेअरीतील १३ अश्या १७ जणांना जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे.तर लो रिस्क कॉन्टॅक्ट मधील लोकांना होम कोरंटाईन केले आहे.अपशिंगे (मि.)ग्रामपंचायतीने गावात औषध फवारणी सुरू केली आहे.