भरतगावावाडी येथे युवकाची आत्महत्या


स्थैर्य, नागठाणे, दि. १४ : भरतगावावाडी (ता.सातारा) येथे युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.गणेश नंदकुमार चव्हाण (वय.२७) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.मंगळवारी पहाटे ६ वाजण्याच्या पूर्वी त्याने भरतगावावाडी येथील रानातील झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.याची फिर्याद चुलतभाऊ रोहित नानासो चव्हाण याने बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसून पुढील तपास हवालदार बाबा महाडिक करत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!