पिस्तूल घेवून वावरणार्‍या युवकास अटक


स्थैर्य, कराड, दि. 6 : रेल्वे स्टेशन-एमएसईबी रोडला पिस्तूल घेवून वावरणार्‍या संग्राम प्रल्हाद पवार (वय 30), रा. हजारमाची, ता. कराड याला गुरुवारी पहाटे 5 च्या सुमारास कराड शहर पोलिसांनी अटक केली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संग्राम प्रल्हाद पवार हा रेल्वे स्टेशन-एमएसईबी रोडला पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे कराड शहर पोलिसांनी त्या परिसरात सापळा लावला असताना गुरुवारी पहाटे 5 च्या सुमारास बनवडीकडे निघालेल्या एका रिक्षाला अडवून त्यामध्ये असलेल्या संग्राम प्रल्हाद पवार याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल मिळून आले. पोलिसांनी त्याला अटक केली असून  पोलीस उपनिरीक्षकराहुल वरोटे पुढील तपास करत आहेत. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव व वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील, पोलीस हवालदार प्रशांत पवार, संग्राम पाटील, चव्हाण व होमगार्ड थोरात यांनी केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!