दैनिक स्थैर्य | दि. 27 जानेवारी 2024 | सोलापूर | आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघांमधून आपल्या सर्वांच्या विचाराचा उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी आपण सर्वजण कार्यरत राहू; असे मत आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजयमामा शिंदे व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे.
आमदार बबनदादा शिंदे यांच्या माढा येथील निवासस्थानी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व आमदार बबनदादा शिंदे व आमदार संजयमामा शिंदे यांच्यामध्ये खाजगी बैठक झाली असून आगामी माढा लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली असल्याचे समोर आले आहे.
माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये जे प्रलंबित प्रश्न आहेत. त्यामध्ये पाणी प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असून मतदारसंघांमधील सर्वांना पाणी मिळण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितरित्या काम करून राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्व प्रलंबित प्रश्न आगामी काळामध्ये कसे सोडवता येतील; याबाबत आपण आग्रही राहून कामकाज करणे आवश्यक आहे; असे मत यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघांमधून मतदारसंघांमध्ये प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित कामकाज करणे आवश्यक आहे. त्यानुसार आगामी माढा लोकसभा मतदारसंघाची सर्वांनी एकत्र मिळून रणनीती ठरवून आपण मतदारसंघातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी आग्रही राहू; असे मत यावेळी आमदार बबनदादा शिंदे यांनी व्यक्त केले.
आगामी काळामध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये आपल्या सर्वांच्या एक विचाराने उमेदवार देऊन त्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करण्यासाठी सर्वांनी कार्यरत राहणे गरजेचे आहे. आगामी काळामध्ये माढा लोकसभा मतदारसंघांमधील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वजण मिळून कार्यरत राहू असे मत यावेळी आमदार संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केले.
आगामी निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघाचा पूर्ण विकास करण्याच्या दृष्टीने सर्वांनी ठरवून आपण एकत्रित रित्या कामकाज करणे आवश्यक असून येणाऱ्या काळात मतदार संघाचा विकास करणाराच उमेदवार आपण निवडून देण्यासाठी प्रयत्नशील राहू; असे मत यावेळी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.