स्थैर्य, सातारा, दि. १३ : वाई आणि कोरेगाव तालुक्याच्या सीमेवर असलेला वंदनगड. याच गडाच्या संवर्धनासाठी गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. रविवारी तब्बल १४ गावातल्या तरूणांनी एकत्र येऊन गडावरील पहारेकऱ्यांचा राजमार्ग, धान्य कोठराची स्वच्छता केली. गडावर दिवसभर कार्यकर्त्यांनी श्रमदान केले.
श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठान चंदन वंदन प्रांतचा पुढाकार..वंदनगडाच्या संवर्धनासाठी या परिसरातले युवक सतत झटत आहेत. श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठान चंदन वंदन प्रांतच्या माध्यमातून गडावर संवर्धनाच्या मोहिम राबविण्यात येतात. पहारेकऱ्यांचा राजमार्ग, धान्य कोठराची केली स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत भुईंज, चाहुर, चिकनेवाडी, जांब, किकली, बेलमाची, गोवेदिगर, राऊतवाडी, मालगाव, वनगळ, गोवे, खोलवडी, किन्हई, पळशी या गावच्या मावळे सहभागी झाले होते. या मोहिमेला चांगले बळ प्राप्त झाले. अशीच साथ मिळाली तर येणाऱ्या काही महिन्यात गडाचं रूपच बदलेल, अशी माहिती श्री शिववंदनेश्वर प्रतिष्ठान चंदन वंदन प्रांतच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.