स्थैर्य, सातारा, दि. १२: नायगाव येथील मुलाचा खून त्याच्याच अल्पवयीन भावाकडून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. किरकोळ भांडण झाल्यावर त्याने लहान भावावर कुऱ्हाडीने वार केल्याचे पोलिसांना चौकशीत सांगितले.
याबाबत माहिती अशी, दिनांक १०/५/२०२१ रोजी दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.०० वा . चे दरम्यान मौजे नायगांव ता.खंडाळा जि.सातारा गांवचे हद्दीत गुजरमळा नांवाचे शिवारात प्रशांत चन्नप्पा जमादार वय ८ वर्षे याच्या गळयावर व डोक्यात कोणीतरी अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने मारुन त्याचा खून झाला होता. याबाबत चन्नप्पा नरसन्ना जमादार वय ३५ वर्षे रा . गुजरमाळ माळवरस्ता नायगांव ता.खंडाळा जि.सातारा यांनी दिले तक्रारीवरुन शिरवळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नमुद गुन्हयाची माहिती मिळताच गुन्हयाचे घटनास्थळी श्री.अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा , श्री.धीरज पाटील , अपर पोलीस अधीक्षक सातारा , श्री.तानाजी बरडे , उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण उपविभाग फलटण , श्री.किशोर धुमाळ , पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , सातारा , श्री.उमेश हजारे , पोलीस निरीक्षक , शिरवळ पोलीस ठाणे , श्री.रमेश गर्जे , सहायक पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , सातारा तसेच स्थानिक गुन्हे शाखा व शिरवळ पोलीस ठाणे येथील अधिकारी व अंमलदार यांनी भेट दिली.
सदरचा गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेवून गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखा , सातारा व शिरवळ पोलीस ठाणे यांना दिल्या.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा , सातारा व शिरवळ पोलीस ठाणे कडील तपास पथकाने घटनास्थळाचे सुक्ष्म निरीक्षण करुन फिर्यादी, त्याची पत्नी व मोठा मुलगा तसेच आजूबाजूच्या परिसरातील रहिवासी यांचेकडे प्राथमिक विचारपूस केली असता फिर्यादीचा मयत मुलगा याचे त्याचा मोठा भाऊ वय १२ वर्षे याचेशी दुपारच्या वेळेला भांडण झाल्याची माहिती समोर आली. त्याअनुशंगाने सदर विधी संघर्षग्रस्त बालक याचेकडे विचारपूस केली असता तो माहिती लपवत असल्याचे निदर्शनास आले. म्हणून त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे कौशल्यपुर्ण विचारपूस केली असता त्याने किरकोळ घरगुती भांडणातून रागाच्या भरात घरातील कुहाडीने त्याचा लहान भाऊ प्रशांत चन्नप्पा जमादार याचे डोक्यात व गळयावर वार करुन त्याचा खुन केला असल्याचे सांगीतले. गुन्हयाची माहिती मिळाल्या पासून दोन तासाचे आत संवेदनशील खुनाचा गुन्हा कौशल्यपुर्ण तपास करुन उघडकीस आणल्याची उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पोलीस अधीक्षक , सातारा व अपर पोलीस अधीक्षक , सातारा यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.
सदरची कारवाई अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक, सातारा व धीरज पाटील अपर पोलीस अधीक्षक , सातारा , श्री.तानाजी बरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग फलटण, श्री.किशोर धुमाळ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा , श्री.उमेश हजारे , पोलीस निरीक्षक , शिरवळ पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली श्री.रमेश गर्जे , सहायक पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा , पोलीस उपनिरीक्षक सागर आरगडे , महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई , स्थानिक गुन्हे शाखेकडील स.फौ.उत्तम दबडे , पो.ना.शरद बेबले , प्रविण फडतरे , निलेश काटकर , रवि वाघमारे , विशाल पवार , पंकज बेसके , शिरवळ पोलीस ठाणेकडील स.फौ.पांडुरंग हजारे , राजू अहिरराव , पो.हवा.रविंद्र कदम , आप्पासाहेब कोलवडकर , मदन वरखडे , पो.ना.सचिन वीर , पो.कॉ.स्वप्नील दौंड , नितीन महांगरे , संतोष ननावरे , सचिन शेलार , मंगेश मोझर , विकास इंगवले यांनी केलेली आहे.