तरुणांनी सचिन रणवरे यांचा आदर्श घेणे गरजेचे : जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ मार्च २०२२ । फलटण । फलटण सारख्या ग्रामीण भागामध्ये काम करत असताना समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन काम करणे हे गरजेचे असते. कोळकी पंचायत समिती गणामध्ये सचिन रणवरे यांनी तरुणांचे चांगल्या प्रकारे संघटन करून गणातील प्रत्येक वाडी व वस्तीवरील तरुणांना एकत्रित करण्याचे काम केलेले आहे. पंचायत समितीच्या माध्यमातुन कोळकी गणाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले कामकाज हे कौतुकास पात्र असून तरुणांनी सचिन रणवरे यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे, असे मत जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी व्यक्त केले.

कोळकी येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे सचिन रणवरे यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने सचिन रणवरे यांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला होता. त्यावेळी जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता बोलत होते. यावेळी कोळकी गावचे जेष्ठ नेते नेते दत्तोपंत शिंदे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, कोळकी ग्रापंचातीच्या सरपंच सौ. विजया नाळे, उपसरपंच संजय कामठे, सौ. अंजली सचिन रणवरे, पोलीस पाटील संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हणमंतराव सोनवलकर, मातोश्री विविध कार्यकारी सोसायटीचे संस्थापक मोहनराव डांगे, कोळकी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच व विद्यमान सदस्या सौ. रेश्मा भोसले, सौ. निर्मला जाधव, सौ. सपना कोरडे, सौ. रुपाली चव्हाण, विकास नाळे, शिवाजी भुजबळ, रमेश नाळे, डॉ. अशोक नाळे, राष्ट्रवादी युवकचे नेते संजय देशमुख, तिरकवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच नानासाहेब काळुखे, निंभोरे ग्रामपंचायतीचे सदस्य नितीन मदने, आंदरुड गावचे युवा नेते शंभुराज विनायकराव पाटील, भाजपाचे कामगार नेते बाळासाहेब काशीद यांच्यासह कोळकी पंचायत समिती गणातील मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फलटण पंचायच समितीचा पाया हाच नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी रचलेला आहे. माजी आमदार डॉ. कृष्णचंद्र भोईटे, चिमणराव कदम यांच्यासह फलटण तालुक्याचे नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे ह्या साठी फलटण पंचायत समितीच्या माध्यमातून कामकाज केलेले आहे. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सभापती पदाची सूत्र हातामध्ये घेतल्यानंतर केलेल्या कामामुळेच त्यानंतरच्या सर्व सभापतींना पंचायत समितीचे कामकाज करणे सोपे झालेले आहे. तद्कालीन परिस्थितीमध्ये मोठा संघर्ष करून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पंचायत समितीला बळकट करण्याचे कामकाज केले, असेही जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी यावेळी स्पष्ट केले.

रणवरे कुंटुंबाचे व आमचे फार पुर्वीपासूनचे संबंध आहेत. कोळकी गावामध्ये निवडणुकीत फक्त राजकारण केले जाते. इतर कधीही कोळकीत राजकारण केले जात नाही. विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर या तिन्ही बंधुंचा विशेष विश्वास हा सचिन रणवरे यांनी प्राप्त केला. सचिन रणवरे यांना आगामी काळामध्ये फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यामध्ये कामकाज करण्याची संधी मिळण्यासाठी आपण सर्व जण प्रयत्न करू, असे मत जेष्ठ नेते दत्तोपंत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले.

पूर्वनियोजित कामानिमित्त पंढरपूरला गेलेलो होतो. मला ज्यावेळी सचिन रणवरे कार्यक्रमासाठीचा फोन आला त्यामुळेच मी पुन्हा कोळकीमध्ये आलो. रणवरे कुटुंबाचे व आमचे जुने संबंध आहेत. कोळकीमध्ये फक्त निवडणुकीच्या वेळी राजकारण चालते. सचिन रणवरे यांची पुढची वाटचाल हि नक्कीच चांगली असेल व त्यासाठी आमच्या सदिच्छा कायमच त्यांच्या सोबत असतील, असे मत भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी केले.

विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पंचायत समितीमध्ये काम करण्याची संधी दिली हीच गोष्ट आमच्या सर्व कुटुंबियांसाठी मोठी आहे. पंचायत समिती साठी तिकीट मला मिळण्यासाठी जेष्ठ नेते दत्तोपंत शिंदे यांनी विशेष प्रयन्त केलेले आहेत, हि गोष्ट कधीही विसरू शकणार नाही. कोळकी पंचायत समिती गणाचा सर्वांगीण विकास करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे. आगामी काळामध्ये सुद्धा कोणतेही पद असो किंवा नसो तरीही विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली कायमच कार्यरत राहणार असल्याचे मत सचिन रणवरे यांनी यावेळी व्यक्त केले.

सचिन रणवरे यांच्या कार्याचा आढावा घेणार्या सन्मानपत्राचे वाचन झिरपवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच महादेव गुंजवटे यांनी केले.

यावेळी कोळकी येथील सागर चव्हाण, तिरकवाडी येथील सी. एम. पवार, कोळकी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच व विद्यमान सदस्या सौ. रेश्मा देशमुख, दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक शशिकांत सोनवलकर, आंदरूड गावचे युवा नेते शंभुराज विनायकराव पाटील, सासकल ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संजय चांगण, भारतीय जनता पार्टीचे कामगार नेते बाळासाहेब काशीद, पोलीस पाटील संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हणुमंतराव सोनवलकर यांच्यासह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मातोश्री विविध कार्यकारी सोसायटीचे संस्थापक मोहनराव डांगे यांनी केले तर आभार तिरकवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच नानासाहेब काळुखे यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!