तरुणांनी व्यायाम व सकस आहार घेणे आवश्यक

प्रा. शरद इनामदार; विद्यार्थी गुणगौरव व शिष्यवृत्ती कार्यक्रमाचे आयोजन


दैनिक स्थैर्य । 28 जुलै 2025 । फलटण । शरीर उत्तम ठेवण्यासाठी तरुण पिढीने योग्य व्यायाम व सकस आहार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माझी प्रा. शरद इनामदार यांनी केले. येथील अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था केंद्र फलटण यांच्यावतीने नवलबाई मंगल कार्यालय येथे विद्यार्थी गुणगौरव व शिष्यवृत्ती कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमास माजी प्राचार्य सुभाषराव देशपांडे, केंद्रप्रमुख विजय ताथवडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

शरद देशपांडे म्हणाले, मी 41 देशांना भेट दिसून प्रत्येक देशाचे वैशिष्ट्य मी अनुभवले. माझी तब्येत उत्तम होती म्हणूनच ते शक्य झाले. यासाठी तरुण पिढीने व्यायाम व उत्तम सकस आहार घ्यावा. प्रारंभी प्रमुख मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख विजय ताथवडकर यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर प्रमुख मान्यवरांना भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित करण्यात आला.

यावेळी दहावी व बारावी व विशेष गुण प्राप्त विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सत्कार करण्यात आला. एकूण नऊ विद्यार्थ्यांना दीड लाख रुपयांचा शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.

सुभाष देशपांडे यांनी संस्थेच्या विविध कार्यक्रमाची प्रशंसा केली. प्रमुख पाहुण्यांची ओळख अमोद कुलकर्णी व सुनील बसावडे यांनी करून दिली. जयदीप देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. अनिरुध्द रानडे यांनी आभार मानले. या समारंभास संस्थेचे सभासद, हितचिंतक, देणगीदार, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!