दैनिक स्थैर्य । दि. १९ जुलै २०२२ । सातारा । नागठाणे (ता.सातारा) येथील उरमोडी नदीतून एक युवक वाहून गेल्याची घटना घडली आहे.रविवारी सायंकाळी ही घटना घडली आहे.बोरगाव पोलिसांनी या युवकाच्या शोधासाठी रविवारी सायंकाळपासून मोहीम राबवली असून अद्याप या युवकाचा ठावठिकाणा लागला नाही.सनी सुधाकर गडकरी (वय.२९,रा.नागठाणे, ता.सातारा) असे या युवकाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,रविवारी सायंकाळी ठीक सहा वा. सुमारास नागठाणे ता.सातारा येथील सनी गडकरी,प्रकाश कांबळे,प्रवीण सूर्यवंशी हे तीन युवक उरमोडी नदी पात्रात पोहण्यासाठी आले होते.त्यातील दोघांनी नदी पात्रात उडी घेतली.परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे त्यातील प्रकाश कांबळे हा युवक बचावला असल्याचे वृत्त समोर आले असून सनी गडकरी हा युवक पाण्याचे प्रवाहासोबत वाहत गेला असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलिस हवालदार एच.बी.सावंत,किरण निकम,उत्तम गायकवाड,अमोल गवळी,सूर्यकांत पवार,कपिल टीकोळे,धनंजय जाधव यांनी घटनास्थळी धाव नागठाणे येथील जुन्या पुलापासून शोध मोहीम चालू केली.तरीही पाण्याच्या वेगवान प्रवाहाबरोबर वाहून गेलेल्या सनी गडकरी याचा सोमवारी रात्री उशिरापर्यंत पत्ता लागला नाही.तसेच माजगाव,अतीत येथील उरमोडी नदीवरील बंधाऱ्यापर्यंत जाऊन बोरगाव पोलिसांनी शोधमोहीम राबवित आहेत. अजूनही याबाबत नागठाणे येथून कोणीही फिर्याद दाखल केली नाही.तरीही बोरगाव पोलिसांकडून अधिक तपास चालू आहे.