सासकलमधील तरुण पिढी दारूच्या आहारी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०५ सप्टेंबर २०२२ । फलटण । मौजे सासकल ता.फलटण येथे अवैधरित्या दारू विक्रेते दारू विकत असल्यामुळे तरुण पिढी दारूच्या आहारी जात असल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत.याला वेळीच पायबंध घातला नाही तर अनेकांचे संसार उध्वस्त होतील व गावातली शांतता व सुव्यवस्था धोक्यात येईल.

यापूर्वीही मौजे सासकलमध्ये तीन ठिकाणी दारूचे अवैध विक्री सुरू होती. त्याला पायबंद घालण्यासाठी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यातील संबंधित विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करून कोर्टामध्ये तक्रार सुरू आहेत. त्यामुळे दारू विक्रेत्यांना चांगलीच जरब बसली होती.

सध्या गावात दोन ठिकाणी राजरोसपणे दारू विक्री सुरू असल्यामुळे तरुण पिढी या दारूच्या आहारी जात आहे. इतकेच नाही तर हे तरुण दारू पायी शेतीतील अवजारे, औषध मारण्याचे पंप, पाणी साठवण्याचे मोठे बॅरल व घरातील भांडी कुंडी कवडीमोल भावाने विकून आलेल्या पैशातून दारू पिऊन घरातील लोकांना शिवीगाळ व मारहाण करत आहेत. याचा प्रचंड त्रास घरातील गृहिणींना, वृद्ध माता-पित्यांना होत आहे. ग्रामपंचायतीने सुद्धा या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्यामुळे गावात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यास अडथळा निर्माण झाला आहे.

पोलीस प्रशासनाने, गावचे सरपंच व पोलीस पाटील यांनी वेळीच लक्ष घालून या दोन्ही ठिकाणी छापे टाकून किंवा वेगळ्या तंत्राने पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.नाही तर ग्रामस्थ व तरुण मंडळाचे कार्यकर्ते संबंधित ठिकाणी स्वतः विक्रेत्यांना चोप देण्याच्या तयारीत आहेत.

मौजे सासकल ता.फलटण येथे अवैधरित्या दारू विक्रेते दारू विकत असल्यामुळे तरुण पिढी दारूच्या आहारी जात असल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत.याला वेळीच पायबंध घातला नाही तर अनेकांचे संसार उध्वस्त होतील व गावातली शांतता व सुव्यवस्था धोक्यात येईल.

यापूर्वीही मौजे सासकलमध्ये तीन ठिकाणी दारूचे अवैध विक्री सुरू होती. त्याला पायबंद घालण्यासाठी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यातील संबंधित विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करून कोर्टामध्ये तक्रार सुरू आहेत. त्यामुळे दारू विक्रेत्यांना चांगलीच जरब बसली होती.

सध्या गावात दोन ठिकाणी राजरोसपणे दारू विक्री सुरू असल्यामुळे तरुण पिढी या दारूच्या आहारी जात आहे. इतकेच नाही तर हे तरुण दारू पायी शेतीतील अवजारे, औषध मारण्याचे पंप, पाणी साठवण्याचे मोठे बॅरल व घरातील भांडी कुंडी कवडीमोल भावाने विकून आलेल्या पैशातून दारू पिऊन घरातील लोकांना शिवीगाळ व मारहाण करत आहेत. याचा प्रचंड त्रास घरातील गृहिणींना, वृद्ध माता-पित्यांना होत आहे. ग्रामपंचायतीने सुद्धा या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्यामुळे गावात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यास अडथळा निर्माण झाला आहे.

पोलीस प्रशासनाने, गावचे सरपंच व पोलीस पाटील यांनी वेळीच लक्ष घालून या दोन्ही ठिकाणी छापे टाकून किंवा वेगळ्या तंत्राने पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.नाही तर ग्रामस्थ व तरुण मंडळाचे कार्यकर्ते संबंधित ठिकाणी स्वतः विक्रेत्यांना चोप देण्याच्या तयारीत आहेत.

Back to top button
Don`t copy text!