तरुण शेतकरी मुलगा हरवला : ५/६ दिवसांपासून तपास सुरु

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० मे २०२३ । फलटण । डोंबाळवाडी, ता. फलटण येथील तरुण शेतकरी मुलगा शेतात जनावरांच्या धारा काढण्यासाठी गेला, मात्र तो परत न आल्याने त्याचा शोध घेतला असता तो मिळून न आल्याने नातेवाईकांनी तो कोठेतरी निघून गेल्याची खबर लोणंद पोलिस ठाण्यात दिली असून त्याबाबत पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिस तपास सुरु आहे, तथापि गेल्या ५/६ दिवसांपासून त्याचा शोध लागला नसल्याचे सांगण्यात आले आहे.
            मिसिंग व्यक्ती बाबत अधिक माहिती अशी, सचिन नागनाथ धायगुडे, वय ३५, उंची ५ फूट ९ इंच, रंगाने गोरा, नाक सरळ, केस काळे, मिशा पिळदार, दाढी वाढलेली असे त्याचे वर्णन असून जाते वेळी त्याचे अंगात काळया रंगाचा रेघांचा शर्ट, काळया रंगाची नाईट पँट, पायात बूट घातला होता. तो मराठी भाषा बोलतो.
       दि. २३ मे रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सचिन धायगुडे हा बोरीचे शेत नावाचे शिवारात गुरांच्या धारा काढण्यासाठी गेला होता, तो परत आला नसल्याचे या संबंधीच्या फिर्यादीत नितीन नागनाथ धायगुडे यांनी नमूद केले आहे. त्याच दिवशी रात्री ८ वाजता सचिन यास फोन करुन घरी कधी येणार अशी विचारणा केली असता, ५ मिनिटात येतो असे म्हणाला, तेंव्हा पासून त्याचा फोन बंद आहे, आणि तो घरी देखील आला नाही.
            त्यामुळे शेतात, आजूबाजूचे गावात, पै पाहुणे यांचे कडे प्रत्यक्ष जाऊन व फोन वरुन शोध घेतला, परंतू तो कोठेही आला नसल्याचे सांगण्यात आल्याने तो कोठेतरी निघून गेल्याची खात्री झाल्याने पोलिस ठाण्यात खबर देवून शोध घेण्याची विनंती केल्याचे फिर्यादी नितीन नागनाथ धायगुडे यांनी सांगितले.

Back to top button
Don`t copy text!