युवा उद्योजक सागर शहा यांचा अनोखा सामाजिक उपक्रम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १२ नोव्हेंबर २०२१ | फलटण | वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत फलटण शहरातील विविध भागात मिठाई व साहित्य वाटप करुन युवा उद्योजक सागर शहा यांनी अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला. या सामाजिक उपक्रमाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असून सागर शहा यांनी या उपक्रमातून अनेक युवकांना वेगळी प्रेरणा दिली असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

युवा उद्योजक सागर शहा यांचा वाढदिवस दिनांक 5 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. कोरोना महामारीचा फटका आजही अनेकजण सोसत आहेत. नेमकी हीच बाब लक्षात घेवून दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर अडचणीत असलेल्या कुटूंबांची दिवाळी गोड करण्याच्या उद्देशाने सागर शहा यांनी वाढदिवसाचा इतर खर्च टाळून शहरातील विविध भागातील कुटूंबांमध्ये मिठाईचे व इतर जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले.

याबाबत बोलताना सागर शहा यांनी सांगितले की, ‘‘कोरोना महामारीचा आर्थिक, कौटुंबिक, व्यावसायिक फटका असंख्य कुटूंबांना बसला आहे. अनेक कुटूंबे अजूनही यातून सावरलेली नाहीत. याचेच भान ठेवून वडील सुधीरशेठ गजकुमार शहा व चुलते सुशीलशेठ शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक जबाबदारी म्हणून दिपावली सणाच्यानिमित्ताने फलटण शहरातील बारसकर गल्ली, दत्तनगर परिसरासह फलटण शहरातील शेकडो कुटुंबांना मिठाई व इतर साहित्य देऊन या कुटूंबांची दिवाळी आनंददायी बनवण्याचा छोटेखानी प्रयत्न आपण केला आहे.’’

दरम्यान, वाढदिवसादिवशी सागर शहा यांनी प्रारंभी प्रभू श्रीराम व महावीर चंद्रप्रभू यांचे दर्शन घेत आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर आपल्या मित्रांना व इतर सहकार्‍यांना बरोबर घेऊन सर्वत्र मिठाई व इतर साहित्य वाटप केले. यावेळी सागर शेठ शहा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. वाढदिवसानिमित्त सामाजिक, राजकीय, उद्योग आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सागर शहा यांनी शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!