दैनिक स्थैर्य | दि. ३० सप्टेंबर २०२३ | फलटण |
श्रीराम सहकारी साखर कारखाना आता सुस्थितीत चालला आहे. या कारखान्याला आम्ही अवसायानातून बाहेर काढून जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबर ऊसदर देत येथील ऊस उत्पादकांना समृद्ध करत आहे. मात्र, हे आमच्या विरोधकांना बघवत नाही. त्यांनी याही कारखान्यात राजकारण करायला सुरूवात केली आहे. त्यांनी खतरूड धंदे स्वराज साखर कारखान्यात करावेत. त्या कारखान्याला कसे सुस्थितीत आणता येईल हे पाहावे, उगीच आमच्या पायात पाय घालू नये, नाहीतर त्यांचा पाय निघेल, असा इशारा विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांना लगावला आहे.
श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या ६८ व्या वार्षिक सभेत रामराजे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, कारखान्याचे चेअरमन, व्हा. चेअरमन यांच्यासह संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.
श्रीमंत रामराजे म्हणाले की, आज फलटण तालुयात कुठे बर्यापैकी पाऊस, तर कुठे अत्यल्प पाऊस झाला आहे. एकंदरीत आज आपल्या तालुयात समाधानकारक पाऊस झालेला नाही. आज उसाचा गाळप हंगाम तीन महिनेच चालतो. कारण उसाचे उत्पादनच निघत नाही. आपण कितीही धरणे बांधली, तरीही पाऊस जर पडला नाही तर धरणात पाणी येणार कुठून? त्यामुळे तालुयातील शेतकर्यांनी नुसता धरणातील पाणी आपल्याला कसे मिळेल, याचा विचार न करता आज अनियमित पाऊस पडत आहे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. नुसते कारखान्याचा दर आणि रिकव्हरी याचा विचार करून चालणार नाही. जागतिक तापमानवाढीमुळे सर्व जगातच आज पावसाची अनियमितता आहे. त्यामुळे असल्या पावसात आपल्याला कोणती पिके घ्यावी लागतील, कमी पाण्यावर येणारा उसाचा वाण व इतर पिकांचे वाण तयार केले पाहिजेत, तरच यापुढील काळात आपल्याला उसाचे उत्पादन घेता येईल. ऊस पिकला तरच कारखाना टिकेल व कारखाना टिकला तरच ऊस उत्पादक शेतकरी टिकेल, हे साधे गणित आहे. आज भाटघर धरण नसते तर आपले संस्थान व आपल्या तालुयाचे काय हाल झाले असते, याचा विचार न केलेलाच बरा. आज श्रीरामसहीत तालुयातील इतर कारखाने चालले आहेत, ते फत या धरणांवरच.
श्रीराम साखर कारखाना आज सुस्थितीत आहे. चांगला दर देत आहे. ऊस उत्पादकांचे हित जपण्याचे काम करत आहे. मात्र, हे विरोधकांना पाहवत नाही. त्यांनी स्वत: चालवत असलेल्या कारखान्याचे राजकारण आमच्या कारखान्यात सुरू करायचे ठरविले आहे. मात्र, हे आम्ही होऊ देणार नाही. विरोधकांनी स्वत:च्या कारखान्यावर कर्ज किती आहे, देणी किती आहेत, रिकव्हरी किती आहे, गाळप क्षमता किती आहे, हे पाहावे. पाच वर्षात ज्या माणसाने कारखान्याला कधी ऊस घातला नाही, तो श्रीराम कारखान्यावर बोलत आहे. त्यांनी उसाला १० हजार रूपये टनाला दर द्यावा, आहे का त्यांची हिम्मत. त्यांनी आपल्या कारखान्याला दहा ऊसटोळ्या दहा दिवस उपाशी ठेवल्या होत्या, का ठेवल्या होत्या? त्यांनी श्रीराम कारखान्यावर डोळा ठेवला आहे. कारण आता या माणसाला श्रीराम कारखाना लुटायला राहिला आहे. श्रीराम कारखाना जेव्हा अवसायानात निघाला होता, त्यावेळी आम्ही त्यास ऊर्जितावस्था दिली व येथील ऊस उत्पादक शेतकर्याला वाचविले. श्रीराम कारखान्याचे जे करार झाले आहेत, ते पारदर्शक आहेत. हे करार झाले नसते, तर आज हा कारखाना चालू स्थितीत दिसला नसता. शेतकर्यांनीही आम्ही केलेल्या कामाचे चीज करावे, उगाच आलतूफालतू लोकांच्या हातात कारखाना देऊ नये. आम्ही आमचा कारखाना समर्थपणे चालवत आहे. आम्ही कारखान्यात राजकारण आणत नाही. व्यवसायाची ठिकाणी व्यवसायच आम्ही करतो.
श्रीराम कारखान्याच्या माध्यमातून उसाला जास्तीत जास्त दर देणार – श्रीमंत संजीवराजे
श्रीमंत संजीवराजे शेतकर्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, फलटण तालुयात उसाचे क्षेत्र प्रचंड वाढलेले आहे. ज्याला त्याला ऊसच करायचा आहे. त्यामुळे तालुयात पाण्याची मागणी वाढलेली आहे. श्रीराम कारखाना काय परिस्थितीत होता, आज येथपर्यंत येऊन पोहोचलेला आहे, हे सर्वश्रुत आहे. या ठिकाणी सुरूवातीला कामगारांचे पगारही होत नव्हते. मात्र, आज आपण या सर्व अडचणींतून बाहेर पडलो आहोत. आज एफआरपीपेक्षाही पुढचा दर देण्याची कुवत कारखान्याची तयार झाली आहे. जेव्हा कारखाना अवसायानात निघाला होता, तेव्हा रामराजेंनी आपल्या-तुमच्या वाडवडिलांचा कारखाना अवसायानात जाऊ न देण्याचे धोरण ठेवले आणि त्याला अनुसरून त्यावेळी रामराजेंनी सहकारातील एक आगळावेगळा संस्थांमधील भागिदारीचा करार केला. हा कारखाना आपण कुठल्याही खाजगी व्यतीला चालवायला दिलेला नाही. जवाहर साखर कारखाना व श्रीराम साखर कारखाना या दोन संस्थांमधील १५ वर्षांचा झालेला करार हा एक यशस्वी करार ठरला आहे आणि यापुढेही १५ वर्षे हा करार आपण पुढे चालू ठेवणार आहे. त्या कराराप्रमाणे बँकांची काही देणी होती, ती आपण १५ वर्षात दिलेली आहेत. त्यावेळी एफआरपीपेक्षा जादा दर देता येणार नाही, असा नियम होता. कामगारांना कपात सोसावी लागणार होती. बोनसही ३३ टयांच्या वर देता येणार नव्हता; परंतु या गोष्टी आपण बाजूला ठेवून शेतकरी असतील, कामगार असतील यांना जास्तीचा दर, पगार देण्याचा प्रयत्न आपण केला. त्यावेळी कारखाना आजारी होता; परंतु चालू करारामध्ये असा कोणताही विषय नाही, आता कारखाना सुस्थितीत असल्याने स्पर्धात्मक दर शेतकर्यांना देता येणार आहे, कामगारांना पगारवाढ देता येणार आहे, म्हणजे आता कोणताही बांधील विषय राहिलेला नाही. आता उसाला एफआरपीपेक्षा जास्तीचा दर देता येणार आहे, कामगारांना शासनाच्या नियमाप्रमाणे होणारी पगारवाढ देता येणार आहे. आता कारखान्यात साखरेबरोबरच डिस्टीलरी प्रकल्पही चालवावा लागत आहे. त्यामुळे कोणीही नुसता कारखाना चालवायला घेत नाही, कारखान्याबरोबर डिस्टीलरी प्रकल्पही द्यावा लागतो. आपल्याला यापुढे कारखान्याची गाळप क्षमता, डिस्टिलरीची क्षमता वाढवायची आहे. राहिलेले कर्ज, देणी, व्याज चुकते करायचे आहे, म्हणून जवाहरबरोबर पुन्हा १५ वर्षांचा सहकारातील करार केला आहे. तो संपूर्ण पारदर्शक आहे.
या वार्षिक सभेत अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यकत केली व कारखान्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.