फड सांभाळ तुर्‍याला आला..


स्थैर्य, सातारा, दि. 22 डिसेंबर : फड सांभाळ तुर्‍याला आला.. या मराठी जुन्या सुप्रसिद्ध गीताची आठवण शेतातील ऊस पिकाला आलेल्या तुर्‍यांची दृश्ये पाहिल्यावर ओठावर येतात. सध्या पश्चिम महाराष्ट्रातील विविध सहकारी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला असला तरी पिकाची काढणी अद्याप झाली नसल्यामुळे या ऊस पिकाला प्रचंड प्रमाणात मोठे तुरे आले आहेत. या तुर्‍यांमुळे नक्कीच वजनामध्ये घट होते ,आणि ऊस उत्पादक शेतकर्‍यांना याचा मोठा तोटा होतो. मात्र याचे साखर कारखान्याला काय घेणे देणे असाच उद्विग्न प्रश्न या ऊस उत्पादक शेतकर्‍यांकडून या पिकाकडे पाहिल्यावर मनात येतो हे मात्र नक्की. (छायाचित्र – अतुल देशपांडे, सातारा)


Back to top button
Don`t copy text!