
दैनिक स्थैर्य | फलटण | उन्हाळा सुरु झाला की आंब्याचा सिझन ही एक अगदी आपल्या सर्वांना आवडणारी गोष्ट असते. आणि त्या सिझनमध्ये आंब्याची शाही आमरस थाळी खाण्याचा आनंद घेण्यासाठी आता पुण्याला जाण्याची गरज नाही, कारण ही थाळी आता फलटणच्या हॉटेल सेलिब्रेशनमध्ये सुरु झाली आहे.
हॉटेल सेलिब्रेशनमध्ये शाही आमरस थाळी
फलटण येथील रिंगरोडवर असलेल्या रॉयल क्राऊन बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावर स्थित हॉटेल सेलिब्रेशनमध्ये दररोज दुपारी १२ वाजल्यापासून ते ३ वाजेपर्यंत शाही आमरस थाळीचा आस्वाद घेता येईल. हॉटेलच्या वतीने या थाळीचा आस्वाद घेण्याचे आवाहन फलटणच्या नागरिकांना करण्यात आले आहे.
उन्हाळा हा आंब्याच्या सिझनचा काळ आहे. हा काळ आपल्याला ताजेतवाने आंबे खाण्याची संधी देतो आणि त्याच्याशी संबंधित अनेक रेसिपीही तयार केल्या जातात. विशेषत: आमरस थाळी म्हणजे फक्त आमरस नाही तर हापूस आंब्याचा आमरस त्यासोबत स्पेशल पनीर भाजी, स्पेशल मिक्स व्हेज, बटाटा सुकी भाजी, छोटे सामोसे, थंडगार ताक, फुलके आणि हंगामातील इतर स्वादिष्ट पदार्थांचा समावेश आहे. यासोबत शाही व्हेज थाळीचा ऑप्शन सुद्धा या ठिकाणी दररोज उपलब्ध आहे.
फलटणमध्ये आता शाही आमरस थाळी आणण्यामुळे तिथल्या नागरिकांना पुण्यामध्ये जाण्याची गरज राहणार नाही. ही थाळी तयार करण्यात आणि ती सर्वांना उपलब्ध करून देण्यात हॉटेल सेलिब्रेशनने एक चांगले पाऊल टाकले आहे. त्यामुळे आता प्रत्यक्ष आंब्याच्या सिझनचा पूर्ण आनंद फलटणच्या लोकांना आपल्या शहरातच घेता येईल.
चला तर मग, रिंगरोड येथे असणाऱ्या रॉयल क्रोऊन या इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर असणाऱ्या हॉटेल सेलिब्रेशन येथे शाही आमरस थाळीचा आस्वाद घ्यायला. जर तुमचा ग्रुप येणार असेल तर आमच्याशी आजच संपर्क साधा; ग्रुपसाठी विशेष व्यवस्था आम्ही तुम्हाला करून देतो.