औंध येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षिका योगिता संग्रामजित गोसावी यांना यंदाच्या तालुकास्तरिय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, दि.२५: योगिता गोसावी या मागील पंधरा वर्षांपासून ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. त्यांनी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी तसेच सर्वागीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत.विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी ई लर्निंग,
स्पर्धा परीक्षा,संगीत,ज्युदो कराटे, क्रीडा स्पर्धामध्ये  त्यांनी प्रयत्न केले.
त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांच्या हस्ते आदर्श शिक्षिका पुरस्कार देण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदिप विधाते, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे,शिक्षण सभापती मानसिंग जगदाळे, मंगेश धुमाळ ,
शिवाजीराव सर्वगोड,संदिप मांडवे,सभापती जयश्री कदम, उपसभापती  हिराचंद पवार, गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे, लक्ष्मण पिसे आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते. दरम्यान शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी योगिता गोसावी यांचे अभिनंदन केले.

Back to top button
Don`t copy text!