योगेश कापसे भाजपात; प्रभाग ५ आता भाजपासाठी अधिक सुकर


स्थैर्य, फलटण, दि. 23 नोव्हेंबर : प्रभाग क्रमांक ५ मधील युवा उद्योजक योगेश कापसे यांनी राजे गटाला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला असून या प्रवेशाने फलटणच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कापसे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या वेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांच्यासह पक्षाचे अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवकांमध्ये लोकप्रिय असलेले आणि प्रभाग क्रमांक ५ मध्ये सक्रियपणे काम करणारे रोहित नागटिळे व सौ. कांचन व्हटकर यांना या पक्षप्रवेशाने मोठा फायदा होणार आहे.

योगेश कापसे यांच्या या निर्णयामुळे राजे गटाला “मळठणमध्ये मोठा धक्का” बसल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात सुरू आहे. कापसे यांच्या समर्थकांनीही मोठ्या संख्येने भाजपमध्ये सहभाग नोंदवला असून प्रभागातील आगामी समीकरणे महत्त्वपूर्णरीत्या बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपच्या नेत्यांनी कापसे यांच्या प्रवेशाचे स्वागत करत त्यांच्याकडून प्रभागातील संघटनबांधणी आणि युवा वर्गाशी संवाद अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

कापसे यांच्या या पावलामुळे प्रभाग क्रमांक ५ मधील निवडणुकीची लढत भाजपासाठी अधिक सुकर होणार, अशी राजकीय गणिते सूचित करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!