दैनिक स्थैर्य | दि. २ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
राजकारणासाठी विरोधाला विरोध करून, फलटण तालुक्यात होणारा विकास न पाहून, वैयक्तिक जळफळाटापोटी इतर तालुक्यातील गावकुसाबाहेर टाकलेल्या पुढार्यांना बोलावून केलेला विरोध आहे, असे मत फलटणचे नगरसेवक अशोकराव जाधव यांनी व्यत केले आहे.
कोळकी येथे काल झालेल्या मेळाव्यात आमदार श्रीमंत रामराजेंनी खासदार रणजितसिंह यांना तिकिट मिळू न देण्यासाठी काहीही करण्याचे वतव्य केले होते. त्या वतव्याचा समाचार घेताना अशोकराव जाधव बोलत होते.
जाधव पुढे म्हणाले की, फलटण तालुक्यातील जनतेने आता ओळखलं पाहिजे की, फलटणचा जलदगतीने होणारा विकास व राजे घराण्याची ३० वर्षांची नाकरती राजवट तालुक्यातील तरुण पिढीला दिसत आहे. त्यामुळे फलटण तालुकाच काय संपूर्ण माढा मतदारसंघ आज खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी उभा आहे. फलटण तालुक्यातील जनतेने विचार करण्याची गरज आहे. तरुण पिढीला राजकारणापेक्षा रोजगार महत्त्वाचा आहे, विकास महत्त्वाचा आहे, म्हणून पुन्हा एकदा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरच निवडून येणे गरजेचे आहे.
फलटण तालुक्यातील पुढार्यांनी सुद्धा अपशकुनी राजकीय खेळ्या करून तालुका भकास करू नये. कारण याआधीही दोनवेळा लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांच्याबाबत असाच राजकीय कूटनीतीचा वापर केलेला फलटण तालुका विसरलेला नाही, असे ते म्हणाले.
तूर्तास महायुतीतील घटक पक्ष असल्यामुळे टोकाची टीकाटिपण्णी न करता ते वरिष्ठ नेत्यांवर सोपवून एवढेच म्हणेन की, पक्षाला जागा मागणे किंवा तिकीट मागणे काहीही गैर नाही, तो लोकशाहीचा भाग आहे; परंतु अंतिम निर्णयानंतर माशी शिंकली तर तालुका माफ करणार नाही, असेही नगरसेवक अशोकराव जाधव यांनी म्हटले आहे.