हो ,आम्ही सातारचे पोलीस!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. २० : सातारा शहरातील पोवई नाका या ठिकाणी रस्त्यावर पडलेला खड्डा आज वाहतूक पोलिसांनी स्वतः भरला. येथील पोवई नाका येथे सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले आहे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची व व्यक्तीची तपासणी सुरू आहे, याच ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी मोठा खड्डा होता. त्यात येणारे प्रत्येक वाहन आदळत होते, त्यात महिला वापरत असलेल्या स्कुटी सारख्या दुचाकीला तर मोठ्ठा दणका बसत होता.

सध्याकाळी 4 ते 5 या वेळेत येणारी प्रत्येक दुचाकी यात आदळत होती व पुढे एखादे अपघात होण्याची ही दाट शक्यता असल्याने  ही बाब पोलिसांचा निदर्शनास आणून दिल्यानंतर तातडीने वाहतूक पोलीस निरीक्षक शेलार साहेब यांनी त्या ठिकाणी असलेल्या सर्व पोलिसांना घेऊन खड्डा मुजविण्याचे काम हाती घेतले, शेजारीच सुरू असलेल्या स्मारकाचा कामा ठिकाणी असलेली खडी व ग्रीड आणून स्वतः तो खड्डा मुजविला आणि त्या ठिकाणी ब्यारिकेट्स ही लावले,अश्या प्रकारे पोलीस आपले नित्याचे काम करता करता असे ही सामाजिक काम करत असल्याचे पाहून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी थांबून त्याचे कौतुक ही केले,या मुळे आज सातरकरांना पुन्हा एकदा वर्दीतल्या माणसाची माणुसकी पहायला मिळाली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!