
दैनिक स्थैर्य । दि. २६ डिसेंबर २०२२ । सातारा । स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत “चला जाणुया नदीला” अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत खटाव तालुक्याचा मांजरवाडीपासून येरळा नदीच्या संवाद यात्रेचा उत्साहात दि 19 डिसेंबर 22 रोजी शुभारंभ झालेला आहे. दि.24 डिसेंबर 2022 रोजी वडूज येथे कराड रोड, येरळा नदी पुलाशेजारी सकाळी 9.00 वा. जलपुजनाचा कार्यक्रम मान्यवराच्या उपस्थित जलपुजन, जल प्रतिज्ञा, नदी आरती करुन संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अनुषंगाने डॉ. सुधीर इंगळे, प्रा. दत्ताजीराव जाधव, बलवडी, जि.सांगली येथील नदी समन्वयक संपतराव पवार, प्रयास सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष डाॅ.कुंडलिक मांडवे यांनी येरळा नदी संवाद यात्रेबाबत मार्गदर्शन केले. नदी संवाद यात्रा या कार्यक्रमास अशोक पवार, कार्यकारी अभियंता, सातारा सिंचन विभाग तथा जिल्हा नोडल अधिकारी “चला जाणुया नदीला” यांनी उपक्रमाचे महत्व विशद करून सर्व शासकीय यंत्रणा तसेच विद्यार्थी व नगरवासी यांना सहभागी होणेचे अवहान केले.
उपक्रमला वडूजचे नगरसेवक अभय देशमुख, नगरसेविका राधिका गोडसे, बाबर मॅडम, येरळा नदी समन्वयक प्रकाश जाधव, मध्यम प्रकल्प सिंचन उपविभागाचे सहाय्यक अभियंता श्रेणी-1 विकास बनसोडे, वनपरिक्षेञ अधिकारी शितल फुंदे, शिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे, पाटबंधारे विभागाचे अधिकारी/कर्मचारी, शासनाचे सबंधित विभागाचे अधिकारी/कर्मचारी, प्रयास समाजिक विकास संस्थेचे पदाधिकारी, मायणी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे विद्यार्थी, समर्थ करिअर अकॅडमीचे विद्यार्थी, नूतन प्रशालाचे विद्यार्थी व शिक्षक वर्ग, पत्रकार मित्र नदी समन्वयक, जल अभ्यासक, महिला,आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ, नागरिक, यांना मोठ्या संख्येने उपस्थित होते. मायणी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे विद्यार्थी यांनी संवाद यात्रेबाबत पथनाट्य सादर केले.
यावेळी नदी काठी प्रयास समाजिक विकास संस्थेमार्फत उभारण्यात आलेल्या “येरळामाई नमोस्तुभ्यंम् ” या नामफलकाचे अनावरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर वडूज शहरातंर्गत प्रभातफेरी तसेच हुतात्मा परशुराम विद्यालय आणि छत्रपती शिवाजी विद्यालय या ठिकाणी पथ नाट्य सादर करुन नदीसंवाद यात्रेबाबत जनजागृती करण्यात आली.