“ये दोस्ती हम नहीं… तोंडेगे…”

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ जानेवारी २०२३ । फलटण । महाराष्ट्राचे मुख्य निवडणुक अधिकारी श्रीकांत देशपांडे हे एका कार्यक्रमानिमित्त फलटणला आले होते. श्रीकांत देशपांडे यांचं आणि या मातीच एक वेगळं नातं आहे. कारण फलटण तालुक्याशेजारी असणाऱ्या खटाव तालुक्यातील डिस्कळ हे त्यांचं मूळ गाव. याच डिस्कळमध्ये त्यांचं पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण देखील झालेल. म्हणून डिस्कळ असेल किंवा फलटण असेल या परिसराच आणि त्यांचं भावनिक नात या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहायला मिळालं. त्याचाच हा किस्सा… आणि हा किस्सा शब्दबद्ध केला आहे, स्थैर्य लाईव्ह युट्युब चॅनेलचे संपादक चैतन्य दिलीप रुद्रभटे (9158606046) यांनी…..

श्रीकांत देशपांडे फलटणला आल्यानंतर त्यांचा पहिली ते सातवीपर्यंतचा एक जीवश्य कंठश्य मित्र त्यांना भेटायला आला. अर्थात खटाव तालुक्यातील डिस्कळसारख्या दुष्काळी भागात राहणारा ग्रामीण धाटणीचा एक गृहस्थ मुंबईत मंत्रालयात सहाव्या मजल्यावर बसणाऱ्या अधिकाऱ्याला म्हणजेच राज्याच्या निवडणुक निर्णय अधिकाऱ्याला भेटायला आला. हल्ली तलाठ्यांच्या हाताखाली काम करणारा किंवा एखाद्या शासकीय कार्यालयात contract वर लागलेला शिपायाचासुद्धा एक वेगळाच तोरा आपल्याला पहायला मिळतो. श्रीकांत देशपांडे हे तर राज्याचे निवडणुक अधिकारी त्यांचे राहणीमान आणि वास्तव्य हे राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील वर्तुळात असते. पण, डिस्कळवरुन आलेल्या या गृहस्थाची भेट घेण्यात श्रीकांत देशपांडे यांनी कोणतीही कुचराई केली नाही किंवा संकोच बाळगला नाही. आपण उच्चपदस्थ अधिकारी आहोत याचा कोणताही so called attitude देखील दाखवला नाही.

त्यांनी थेट आपल्या मित्राला जेवायला बोलावले. जिथे राज्यातले सगळे उच्चपदस्थ बसले होते, त्याच पंगतीत या मित्राने देशपांडे यांच्या शेजारी बसून जेवण देखील केले. जेवण करत असताना देशपांडे अभिमानाने सांगत होते, “हा माझा पहिली ते सातवीपर्यंतचा मित्र आहे.” यानंतर मुंबईहून आलेले इतर मान्यवर त्या गृहस्थाशी बोलू लागले. एकाने त्यांना सांगितल, ” आम्ही कालच पुसेगाववरुन फलटणला डिस्कळमार्गे आलो.” या वाक्यानंतर त्या मित्राने देशपांडे यांना जो लूक दिला तो फक्त एक मित्रच आपल्या जवळच्या दुसऱ्या मित्राला देऊ शकतो. “डिस्कळमार्गे तुम्ही येऊन गेला पण, मला काहीच कळू दिलं नाही.”, अस तो लूक फक्त डोळ्यातूनच विचारत होता. हे पंगतीत बसलेल्या सर्वांनी पारखले आणि दोघांच्या घनिष्ठ मैत्रीची चवीने चर्चा केली….

पंगत उठली आणि श्रीकांत देशपांडे यांच्यासारखा खरा आणि down to earth मित्र सर्वांनाच मिळो, एवढीच चर्चा बसलेल्या सर्वांच्यात सुरु झाली. थोडक्यात काय तर ” ये दोस्ती हम नहीं छोडेंगे…” या लोकप्रिय गाण्याचा अनुभव उपस्थितांनी अनुभवला.

एवढी मोठी स्टोरी समोर घडतीये हे पाहून आम्हाला मोह काही आवरला नाही. आमचे टाइम्स नाऊ या न्युज चॅनलला काम करत असलेले मित्र स्वप्नील शिंदे यांना सांगून या दोहोंचे हे क्षण टिपायला लावले. शिंदे यांनीही लगेचच प्रमोद भुजबळ यांना सांगत छायाचित्र टिपले. सर्वांना कळण्यासाठी त्या डिस्कळच्या मित्राला दाखवले आहे.


Back to top button
Don`t copy text!