टाकळवाडेची ग्रामदैवत श्री पद्मावती देवीची ११ व १२ एप्रिल रोजी यात्रा; विविध मनोरंजनाचे व कुस्त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १० एप्रिल २०२३ | फलटण |
टाकळवाडे, तालुका फलटण येथील ग्रामदैवत श्री पद्मावती देवीच्या यात्रेनिमित्त दि. ११ व १२ एप्रिल रोजी ग्रामस्थांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.
दि. ११ रोजी सकाळी १२ वाजेपर्यंत देवीला पोळ्यांचा गोड नैवेद्य प्रसाद, दुपारनंतर पारंपरिक पद्धतीने बकर्‍यांचा कार्यक्रम. रात्री ८ नंतर मनोरंजनासाठी आर्केस्ट्रा कार्यक्रम.

दि. १२ रोजी पहाटे ५.०० वाजता पालखी छबिन्याचा कार्यक्रम. ५.०० वाजता मंदिरातून पालखी छबिना निघणार आहे. पालखीसोबत सासनकाठ्या, पारंपरिक वाद्यवृंद, बेंजो, फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाच्या उधळणीत पालखी ग्राम प्रदक्षिणेस निघते.

सकाळी १०.०० वाजता पालखीचे मिरवणुकीने मंदिरात पुनरागमन. त्यानंतर मंदिर परिसरात मनोरंजनासाठी लोकनाट्याचा कार्यक्रम. दुपारी ३.०० नंतर कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन केले आहे. आखाड्यामध्ये नामवंत पैलवानांच्या हजारो रुपये इनामाच्या कुस्त्यांचा थरार अनुभवायला मिळतो. आखाड्यात नामवंत पैलवान हजेरी लावतात.

यात्रेनिमित्त ग्रामस्थांच्या वतीने ग्राम स्वच्छता अभियान राबविले आहे. यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी यात्रा कमिटी, ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. यात्रेतील विविध कार्यक्रमांचा लाभ ग्रामस्थ, भाविक भक्तांनी घ्यावा, असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!