स्थैर्य, सातारा, दि. १ : 1 नोव्हेंबर 1956 साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्र गुजरात या द्वैभाषिक राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली आणि याच दिवशी साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले.
आपण मुख्यमंत्री झालो, याबद्दल मत मांडताना यशवंतरावजी चव्हाण साहेब म्हणतात, “मी मुख्यमंत्री झालो याचा अर्थ पुरोगामी वृत्ती भारतात काम करू लागली आहे. कोणी कोणत्याही ठिकाणी जाऊ शकतो हे दिसून आले. बहुजन समाजाला शिक्षणाचा लाभ देणारे महात्मा फुले व राजर्षी शाहू झाले नसते, स्वातंत्र्य चळवळ चालवताना मातीचे सोने बनवणारे महात्मा गांधी झाले नसते, समाजवादाचा साक्षात्कार लावून देणारे पंडित नेहरू नसते, तर देवराष्ट्र या गावचा यशवंतराव गुराखीच राहिला असता. महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व गुजराथ असा सर्व प्रदेश राज्यात आला आहे, त्याच्या विकासाची कामे करणे ही खरी जबाबदारी आहे.”