दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑगस्ट २०२२ । फलटण । मौजे सासकल ता. फलटण गावच्या अतिशय प्रेमळ, कर्तव्यदक्ष, कुटुंबवत्सल आणि कायम सदाचारी व परोपकारी जीवन जगलेल्या सात्विक विचारांच्या प्रसिद्ध उद्योजक व दानशूर व्यक्तिमत्व सायली स्टीलचे सर्वेसर्वा मोहनराव रामचंद्र मुळीक (पाटील) यांच्या मातोश्री यमुना रामचंद्र मुळीक (पाटील) यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले.त्यांच्या जाण्याने संपूर्ण पाटील परिवार व सासकल गावावर शोककळा पसरली आहे.
यमुना रामचंद्र मुळीक यांनी गावचे पोलीस पाटील कै.रामचंद्र मुळीक यांच्या मृत्युनंतर संपूर्ण कुटुंबाची धुरा समर्थपणे सांभाळत कुटुंबाचा भार वाहिला. त्यांनी कधीही कोणताच गर्व केला नाही. अतिशय सलास असे व्यक्तिमत्व त्या होत्या.
त्यांच्या पश्चात त्यांना मुलगा मोहनराव, मुली राजश्री मोहन अनपट, शोभा ज्योतिराम भोसले, वर्षा दादासो सस्ते, मंगल विलास सोनवणे, सून ललिता व नातवंडे असा परिवार आहे.
त्यांच्या कार्यकर्तुत्वाला विनम्र अभिवादन ! त्यांना आजी माजी सासकल गावचे सरपंच, सर्व ग्रापंचायत सदस्य, विविध कार्यकरी विकास सेवा सोसायटी, तरुण मंडळे, सासकल जन आदोलन समिती, शाळा सुधार संघटन, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,मुख्याध्यापक व सर्व शिक्षक शिवशंकर माध्यमिक विद्यालय, सासकल व संपूर्ण गावच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.