लाठीचार्जच्या निषेधार्थ ‘वाई बंद’ यशस्वी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ५ सप्टेंबर २०२३ | वाई |
मराठा आरक्षणासाठी जालना येथे बसलेल्या आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज ‘वाई बंद’ पाळण्यात आला. वाईत सकाळपासूनच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते.

मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ मंगळवारी वाई शहर बंदची हाक देण्यात आली होती. दिवसभर अत्यावश्यक सेवा वगळता शहर बंद ठेवण्यात आले होते. बंदच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा-कॉलेज बंद होते. एसटी बस सुरळीत सुरू होत्या. मात्र, बसस्थानकावर तुरळक गर्दी होती. सर्व व्यवसाय बंद ठेवून व्यापार्‍यांनी बंदला पाठींबा दिला होता. दुपारी १२ नंतर भाजी मंडई सुरू झाली. परंतु विक्रेत्यांना ग्राहकांची वाट पहात रहावे लागले. बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट होता.

दरम्यान, सातारा जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यासाठी सकाळी वाईहून सातार्‍याकडे शेकडो कार्यकर्त्यांसह पायी निघालेला मोर्चा पुणे-बंगळुरू महामार्गावर पाचवड येथे प्रशासनाने अडविला. तेथे शासनाला निवेदन देऊन मोर्चा स्थगित करण्यात आला.

उपविभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपनिरीक्षक कृष्णकांत पवार, सुधीर वाळुंज, बिपीन चव्हाण आदी अधिकार्‍यांचा-कर्मचार्‍यांचा समावेश असलेला बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


Back to top button
Don`t copy text!