दैनिक स्थैर्य । दि. ०३ नोव्हेंबर २०२२ । सातारा । सातारा येथील शासकीय विश्रामगृहा शेजारीच नवीन सर्किट हाउसचे बांधकाम सुरु आहे. ही जागा तशी पैलवानांना तशी अडगळीची वाटली अन् सोमवारी दुपारी अचानकपणे २५ ते ३0 पैलवानांची सुरुवातीला बुकलाबुकली दोन गटात झाली. दरम्यान, या गटातील एका पैलवानाला पाईपने मारहाण झाली. अन क्षणात तणावाचे वातावरण झाले. प्राथमिक माहितीनुसार व्यवहारातून वाद झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात आले. मात्र, दुसऱ्या दिवशीही त्याची नोंद नव्हती. या सर्व घडामोडीचे चित्रणचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने साताऱ्यात याचीच चर्चा खुमासदारपणे रंगली होती.
सातारा जिल्हा परिषदेच्या पाठीमागे नव्या सर्किट हाउसचे काम सुरु आहे. ही जागा तशी पैलवानांना अडगळीची वाटली अन सोमवारी दुपारी २५ ते ३0 पैलवान या परिसरात थांबले, सुरुवातीला शाब्दीक द्वंद्व सुरु होते. मात्र, नंतर एकेरी येथ एकाने लोखंडी पाईपनेच मारहाण केल्याने वातावरण तणावाचे बनले.
यावेळी झेडपीच्या चौकापासून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी या भांडणाचा जोरजोराचा आवाज घेत पुढे आले. त्यावेळी समोरील प्रकार पाहता कोणीही पुढे येवून मध्यस्थी करु शकत नव्हते. इथे पाहता पाहता बघ्यांचीच गर्दी वाढू लागली. याचवेळी पैलावानांच्या दोन्ही गटात वादावादी सुरु असताना एका पैलवानाच्या मागे इतर पैलवान लागले होते. प्राथमिक माहितीनुसार हा वाद व्यवहारातून झाल्याचे बोलले जात असले तरी हा वाद वाळू ठेक्यावरुनच विकोपाला गेल्याचे नंतर चर्चा जोमात होत्या. या पैलवानांच्या दोन गटात झालेल्या राड्यामध्ये सातारा अन कराड येथील पैलवानांचा समावेश होता. या दोन्ही गटात राडा सुरु होता त्यावेळी काहीजण सबुरीने घेण्याबाबत विनवनी करत होते मात्र तिकडे पूर्णत: दुर्लक्ष करुन हा वादा विकोपाला गेला होता.