खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते भवानी तलवारीचे पूजन


दैनिक स्थैर्य । दि. ७ ऑक्टोंबर २०२२ । सातारा । खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते मानाच्या भवानी तलवारीचे पारंपारिक पद्धतीने जलमंदिर मध्ये पूजन करण्यात आले. यंदा शाही घराण्याने माजी नगराध्यक्ष शिवाजी राजे भोसले यांच्या निधनामुळे यंदाचा दसरा अत्यंत साधेपणाने साजरा केला . सातारा शहरात मात्र दसऱ्याचा जंगी जल्लोष पहायला मिळायला . सातारकरांनी एकमेकांना सोने देत सीमोल्लंघन केले.

साताऱ्यात दरवर्षी दसऱ्याची शाही मिरवणूक जलमंदिर ते पोवई नाका यादरम्यान काढली जाते मात्र साताऱ्याची माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले यांचे मागील आठवड्यात निधन झाल्याने यावेळी शाही मिरवणूक ूक रद्द करण्यात येऊन यंदाचा दसरा अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे असे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे कळवले होते त्याप्रमाणे विजयादशमीच्या मुहूर्तावर सायंकाळी साडेपाच वाजता उदयनराजे यांच्या हस्ते मानाच्या पारंपारिक भवानी तलवारीचे विधिवत पूजन करण्यात आले पुरोहित्य उपेंद्र धांदरफळ यांनी केले त्यानंतर उदयनराजे यांनी निवडक सहकाऱ्यांना सोने देत मोजक्या सहकाऱ्यांशी संवाद साधला.

साताऱ्यात मात्र दसऱ्याचा कुठे जाणारा उत्साह पाहायला मिळाला वाहन बाजारात आणि सराफ बाजारामध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाली अनेक गृहप्रकल्प शानदार पद्धतीने लॉन्च झाले त्यामुळे यंदा व्यावसायिक बाजारपेठेत मोठी उलाढाल झाल्याने व्यापारी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे मोती चौक ते खण आळी मोती चौक ते पोवई नाका यादरम्यान खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारपेठेत प्रचंड गर्दी केली होती त्याचबरोबर दशमीच्या मुहूर्तावर आदिशक्तीच्या जागराचा शेवटचा दिवस असल्याने पारंपारिक पद्धतीने देवींना निरोप देण्यात आला त्याकरिता सातारा पालिकेने बुधवार नाका येथे कृत्रिम विसर्जन तळी सज्ज ठेवले होते मोती चौक ते बुधवार नाका यादरम्यान पोलिसांनी उत्तम बंदोबस्त ठेवला होता काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली होती विसर्जन मिरवणुका टप्प्याटप्प्याने वाहतुकीची अडथळा होणार नाही अशा पद्धतीने बुधवार नाक्याकडे रवाना करण्यात आल्या रात्री उशिरापर्यंत देवी विसर्जनाच्या मिरवणुका सुरू होत्या यंदाचा दसरा जोरदार केल्याने दिवाळी सुद्धा दणकेबाज होणार हे स्पष्ट झाले आहे त्यामुळे व्यापारी वर्गामध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे.


Back to top button
Don`t copy text!