शंभू महादेव मंदिरामध्ये अज्ञातांकडून पूजेचे व सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या साहित्याची मोडतोड


स्थैर्य, शिखर शिंगणापूर, दि. 25 : येथील शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये काही अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या वेळी मंदिराची लाईट बंद करून मंदिरामध्ये प्रवेश केला. त्यानंतर मंदिरातील पूजेचे साहित्य व सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या साहित्याची तोडफोड करून नुकसान केले. तसेच पहाटे चार वाजता मंदिरातील घंटा वाजवण्याचा प्रकार गुरुवारी रात्री मंदिरात घडला. या घटनेमुळे शिंगणापूर परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंदिराचे पुजारी संतोष बडवे हे सकाळी मंदिर उघडण्यासाठी आले असता आतमध्ये साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे त्यांना दिसून आले. याची माहिती त्यांनी देवस्थान समितीचे कार्याध्यक्ष ओंकार देशपांडे यांना दिली. झालेल्या प्रकाराबाबत सेवाधारी यांनी शिंगणापूर पोलीस दूरक्षेत्रामध्ये जाऊन तक्रार केली आहे.

या सर्व प्रकारामुळे शिखर शिंगणापूर मंदिर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांकडून झालेल्या प्रकाराचा तपास करून गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. शिंगणापूर पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार राऊत यांनी भेट देऊन झाल्या प्रकाराची पाहणी केली करून लवकरात लवकर गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!