दैनिक स्थैर्य । दि. ०७ डिसेंबर २०२२ । फलटण । महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषीकन्यांनी कृषी कार्यानुभव उपक्रम २०२२-२०२३ अंतर्गत सासकल येथे ‘जागतिक मृदा दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला.
यावेळी या कार्यक्रमास गावचे सरपंच उषाताई फुले, प्रमोद जाधव तालुका कृषी अधिकारी फलटण, अमोल सपकाळ मंडळ कृषी अधिकारी विडणी, लक्ष्मण पाटील मार्केटिंग ऑफिसर, सचिन जाधव कृषी सहाय्यक सासकल आणि अनुजा कर्वे माती व पाणी परीक्षण तज्ञ के बी एक्सपोर्ट इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड आदी, मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माती परीक्षण तज्ञ अनुजा कर्वे यांनी शेतकऱ्यांना मातीचे व माती परीक्षणाचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर, प्रा.नीलिमा धालपे, कार्यक्रमाधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे, प्रा. नीतीशा पंडित यांचे कृषीकन्या वैभवी ढमे, शिल्पा भिसे, दीप्ती भोईटे, मैथिली पोरे, अस्मिता सावंत, गौरी रणदिवे, आर्या शिंदे यांना मार्गदर्शन मिळाले.