सुपर गर्ल स्वराच्या सायकलींची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियात नोंद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण तालुक्यातील गोखळी येथील कु. स्वरा योगेश भागवत, जन्म दि. १५ ऑक्टोबर २०१४ हीने वयाच्या सहाव्या वर्षी १४३ कि‌लोमिटर अंतर केवळ बारा तासांमध्ये पार केले. तिचा प्रवास पहाटे ३.४५ मिनिटांनी गोखळी येथून सुरु करून बारामती, मोरगाव, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, राजाळे परत गोखळी असा पुर्ण केला.

खेळण्याबागडण्याच्या वयामध्ये सायकलिंग करून सहाव्या वर्षी रेकॉर्ड केले. या कामगिरीची दखल घेत “वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया बुक” नोंद घेऊन नुकतेच तिला प्रमाणात पत्र, गोल्ड मेडल, ट्राफी देऊन गौरव केला.

कु. स्वरा योगेश भागवत वयाच्या तिसऱ्या वर्षी पोहणे धावणे बरोबरच सध्या एका मिनिटात 100 पुश अप्स,
50 प्रकारच्या विविध दोरी उड्या, ट्रेकींग, दोर चढणे, जोर, सूर्यनमस्कार, योगा, कुस्ती इ. व्यायाम प्रकार नियमित करते. तिच्या या कामगिरीबद्दल विविध संस्था, संघटना मान्यवरांनी कु. स्वराचा गौरव करून अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!