जागतिक एड्स दिनानिमित्त स्व्. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० नोव्हेंबर २०२१ । सातारा । 1 डिसेंबर हा   जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. या दिनानिमित्त  जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर एड्स जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती   जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी  दिली.

1 डिसेंबर रोजी एचआयव्ही जनजागृतीमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचारी व संस्था यांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. तसेच डिसेंबर महिन्यामध्ये युवक व युवतींसाठी ऑनलाईन मिमस्, जीआयएफ तयार करणे स्पर्धा, मास्क डिझायनिंग स्पर्धा व सेल्फी विथ स्लोगन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. आकाशवाणी केंद्रावरुन ईएमटीसीटी विषयावरती तज्ञांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. शहरामध्ये मोक्याच्या ठिकाणी जनजागृतीपर होर्डिग्ज लावण्यात येणार आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयातील व ॲकॅडमीतील युवक युवतींसाठी व्याख्यानाचे व रक्तदानाचे शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच शहरी व व ग्रामीण भागामध्ये एचआयव्ही विषयी जनजागृती करुन एचआयव्ही चाचणी करिता प्रोत्साहित करणे इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही श्री. चव्हाण यांनी कळविले आहे.


Back to top button
Don`t copy text!