
दैनिक स्थैर्य । दि. १९ जुलै २०२२ । सातारा । राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांचे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दिनांक 19 जुलै 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात करण्यात आले आहे.
जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय सातारा व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद यांच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेमध्ये तंबाखू नियंत्रण कायदा कोटपा 2003 या कायद्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.