दैनिक स्थैर्य । दि. २५ डिसेंबर २०२२ । फलटण । महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यता प्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय फलटणच्या विद्यार्थ्यांनी नांदल, तालुका फलटण येथे राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त कार्यशाळेचे आयोजन केले, त्यामध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना ऊसाप्रमाणेच फळबागांची लागवड कशा प्रकारे फायद्याची ठरू शकते याचे योग्य मार्गदर्शन केले. कृषी महाविद्यालय फलटणचे विद्यार्थी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत नांदल येथे आगामी पाच आठवडे वास्तव्यास राहणार असून तेथील शेतकऱ्यांना शेती विषयी योग्य मार्गदर्शन करणार आहेत.
राष्ट्रीय शेतकरी दिनाचे औचित्य साधून कार्यशाळेचे आयोजन करून शेतकऱ्यांना आपल्या गावात फळबाग लागवडीखालील क्षेत्र कशाप्रकारे वाढवता येईल व त्याचे संगोपन करून जास्तीत जास्त उत्पादन कसे घेऊ शकतो यावर मार्गदर्शन फलटणचे मंडळ कृषी अधिकारी श्री.सतीश निंबाळकर, कृषी पर्यवेक्षक श्री. योगेश भोंगळे, कृषी सहाय्यक श्री. अरविंद नाळे, नितीन कोळेकर साहेब यांनी सखोल मार्गदर्शन केले.
कृषी महाविद्यालय फलटणचे प्रा. डॉ. सागर निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूत युवराज काळे, धीरज कणसे, ऋषिकेश चव्हाण, विवेक पाठक, गणेश अवताडे, गणेश बोराटे, पृथ्वीराज बाबर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.