दैनिक स्थैर्य । दि. २५ डिसेंबर २०२२ । फलटण । हिंगणगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संचलित कृषी महाविद्यालय, फलटण येथील कृषिदूतांनी कृषी कार्यानुभव उपक्रम 2022-23 अंतर्गत दिनांक 19/12/2022रोजी हिंगणगाव येथे केळी या पिकामधील “पिल्ले काढणी”या विषयाचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांसमोर सादर केले व त्याबद्दल माहिती सांगितली. यावेळी गावातील शेतकरी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, प्रा. एन. एस. ढालपे, प्रा.एन.ए. पंडित, प्रा.एस.वाय. लाळगे आणि विषय मार्गदर्शक प्रा. एस. एस. अडत यांचे कृषीदूत विश्वजीत गिरीगोसावी,मंगेश चव्हाण, मयुरेश भोसले,संकेत दवणे,दीपक मरकड,अभिषेक टेकळे, ऋषिकेश चव्हाण यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.