
स्थैर्य, सातारा, दि. 11 सप्टेंबर : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाची उद्दिष्टे, भूमिका व जाबाबदार्या या माहिती देण्यासाठी उद्या दि. 11 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते सायं. 5 या वेळेत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेस पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुगार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
अभियानची उदिष्टपूर्तीसाठी व अभियानाची सातारा जिल्ह्यामध्ये प्रभावी अंमलबजावणीसाठी विविधस्तरावर कार्यशाळाचे आयोजन येणार आहेत. त्याच अनुषंगाने जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाची संकल्पना, रूपरेषा, उद्दिष्टे व अमलबजावणी या विषयी सविस्तर मार्गदर्शन व माहिती, पंचायत व ग्राम स्तरावर करावयाच्या उपक्रमांची माहिती, अभियानात सहभागी होणार्यांच्या जबाबदार्या, प्रभावी नियोजन व कार्यपध्दती या सर्व बाबींवर सविस्तर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
तरी कार्यशाळेस नेहरु युवा केंद्र, भजनी मंडळ, वारकरी व पाणी-फाऊंडेशन व समाज प्रबोधन संस्था, व्यक्ती कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले आहे.