
दैनिक स्थैर्य । दि. २२ डिसेंबर २०२२ । सातारा । राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबर रोजी जिल्हास्तरावर साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय मानक ब्युरो यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेस सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय प्रमुख तसेच ग्राहकांनी उपस्थित राहून कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी केले आहे.